मैसूरचे उद्योजक हर्षवर्धन किक्केरी त्यांची पत्नी आणि मुलगा तिघांचे मृतदेह घरात आढळले, हत्या-आत्महत्येचा संशय
मैसूरचा उद्योजक, त्याची पत्नी आणि मुलगा या तिघांचे मृतदेह त्यांच्या वॉशिंग्टन येथील त्यांच्या घरात आढळून आले आहेत. अमेरिकेतील स्थानिक वृत्तसंस्थानी दिलेल्या वृत्तातील प्राथमिक अंदाजानुसा हे प्रकरण हत्या आणि आत्महत्या असं असू शकतं. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. उद्योजक, त्याची पत्नी आणि मुलगा यांचे मृतदेह आढळले किंग काऊंटी मेडिकल एक्झामिनर ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार हर्षवर्धन किक्केरी (वय-५७), त्यांची पत्नी श्वेता (वय-४४) आणि मुलगा रुप (१४) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. हर्षवर्धन किक्केरी मैसूरच्या Holoworld रोबोटिक्स कंपनीचे सीईओ होते. त्यांची पत्नी श्वेता कंपनीची सह संस्थापक होती. किंग काऊंटी शेरिफांचे प्रवक्ते बॅडन हल यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना हे हत्या आणि आत्महत्येचं प्रकरण वाटतं आहे. अद्याप या घटनेमागचं कारण समजू शकलेलं नाही. प्राथमिक अंदाजानुसार हर्षवर्धन यांनी पत्नी आणि मुलाची हत्या केली आणि मग स्वतःचं आयुष्य संपवलं असं पोलिसांना वाटतं आहे.
नेमकं काय घडलं?
अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांना 911 या क्रमांकावर एक फोन आला. त्यानंतर पोलीस साऊथईस्ट भागातील टाऊनहाऊस या ठिकाणी पोहचले. तिथे एक सात वर्षांचा मुलगा होता. तो मुलगाही हर्षवर्धन यांचा आहे. तो बाहेर खेळत होता त्यामुळे तो वाचला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घराच्या खिडकीवर रक्ताचे डाग आणि रिकामी काडतुसं आढळली आहेत. प्राथमिक तपासावरुन हे हत्या आणि आत्महत्येचं प्रकरण वाटतं आहे. पोलीस या घटनेमागचं कारण काय? हे तपासण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
हर्षवर्धन किक्केरी कोण होते?
कर्नाटकच्या किक्केरी गावाचे असलेले हर्षवर्धन हे रोबोटिक्स कंपनीचे सीईओ होते. त्यांनी मैसूर आणि अमेरिकेत त्यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं. सिरेक्युज विद्यापीठातून ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाले होते. त्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्येही हर्षवर्धन नोकरी करत होते. त्यावेळी त्यांनी रोबोटिक्सवर विशेष लक्ष दिलं. त्यांना मायक्रोसॉफ्ट गोल्ड स्टार, इन्फोसिस एक्सलन्स अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले होते. हर्षवर्धन किक्केरी यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृत्यू कसा झाला? यामागे काय कारण होतं? या सगळ्याचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेत हर्षवर्धन किक्केरी यांचा सात वर्षांचा मुलगा वाचला आहे अशी माहिती काही स्थानिकांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.