मिरजेतील मालगाव रस्ता परिसरात वाहनांमध्ये बेकायदा गॅस रिफीलिंग करणाऱ्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गॅस सिलिंडर, मोटार असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. अभिजित विलास लोहार (वय ३१, रा गल्ली
नंबर ५, खोतनगर मालगाव रोड, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. निरीक्षक
शिंदे यांनी मिरज परिसरातील अवैध व्यवसायावर कारवाईसाठी सहायक निरीक्षक
नितीन सावंत यांचे पथक तयार केले होते.
पथकाला मिरजेतील मालगाव रस्त्यावर एकजण वाहनामध्ये बेकायदा गॅस रिफीलिंग करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे छापा टाकून लोहार याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून पाच गॅस सिलिंडर, मोटार, रोकड असा मुद्देमाल जप्त केला. त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर, बसवराज शिरगुप्पी, बाबासाहेब माने, अतुल माने, रणजित जाधव, सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.