Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आम्ही निम्म्या जगाचे कर्जदार... पाकिस्तानमध्ये विनोदी मिम्सचा पाऊस; वाचल्यावर तुम्हीही पोट धरुन हसाल

आम्ही निम्म्या जगाचे कर्जदार... पाकिस्तानमध्ये विनोदी मिम्सचा पाऊस; वाचल्यावर तुम्हीही पोट धरुन हसाल 
 

जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील संबंध चांगलेच ताणले आहेत. या दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने तातडीने सिंधू नदीचे पाणी बंद करण्यासोबत इतर पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्याच्या उत्तरात पाकिस्ताननेही शिमला करार मोडण्याची घोषणा केली आहे. या गंभीर वातावरणात मात्र पाकिस्तानी नागरिकांनी विनोदी मीम्स पाठविण्यास सुरुवात केली आहे. महागाई व कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेबाबत पाकिस्तानी नागरीक त्यांच्यात सरकार ट्रोल करताना दिसत आहेत.

पाकिस्तान सरकार ट्रोल

तणावाच्या काळात, पाकिस्तानचे सामान्य नागरिक सोशल मीडियावर त्यांच्या सरकारची आणि देशाच्या वाईट स्थितीची खिल्ली उडवताना दिसत आहेत. त्याच्या निराश आणि व्यंग्यात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या महागाई, प्रचंड कर्ज या समस्यांशी झुंजत आहे. पाकिस्तानचे कराचीसारखे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे. अशा भयान परिस्थितीत पाकिस्तान भारताशी युद्ध करण्याची तयारी करत असल्याने पाकिस्तानी सामान्य नागरीक संतापले आहेत.

नागरिकांचे सरकारला टोमणे
सोशल मीडियावर सध्या मीम्स पाठवून ट्रोलिंग सुरु झाली आहे. एका वापरकर्त्याने विनोदाने लिहिले की, "जर तुम्हाला युद्ध करायचे असेल तर ते ९ वाजण्यापूर्वी करा, आमचे पेट्रोल ९:१५ वाजता संपते." पाकिस्तानमधील वीज आणि गॅस कपातीच्या समस्येवर थेट टीका करणारे हे व्टिट सध्या चांगलेच गाजले आहे. सामान्य पाकिसानी नागरीक सरकारला चांगलेच ट्रोल करताना दिसत आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलेय, "प्रिय भारतीयांनो, जर तुम्हाला कराचीवर हल्ला करायचा असेल तर तुमचे मोबाईल फोन भारतातच सोडा." त्याला कदाचित असे म्हणायचे होते की कराचीची हवा इतकी विषारी आहे की ती इलेक्ट्रॉनिक उपकरणांनाही नुकसान पोहोचवू शकते.

पाकिस्तानी नागरीक त्रस्त

सोशल मीडियावर एका वापरकर्त्याने पाकिस्तानच्या वैयक्तिक सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. त्याने विनोदाने म्हटले, "जर भारताने लाहोरमधील माझ्या ऑफिसवर (सिकंदर अली मल्ही रोड, कॅनाल पार्क गुलबर्ग २, लाहोर, ५४००० क्षेपणास्त्र डागले तर सावध राहा... तेही माझ्याशिवाय इतर सर्वजण ऑफिसमध्ये असताना. जर तुमच्यात हिंमत असेल तर प्रयत्न करा आणि मी तुम्हाला सांगेन." पाकिस्तान सुपर लीगमधील लाहोर कलंदर्स क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीलाही तणावपूर्ण वातावरणात ओढण्यात आले. एका वापरकर्त्याने कमेंट केली, "लाहोर मागण्यापूर्वी, टीव्ही चालू करा आणि लाहोर कलंदर्सची अवस्था पहा, ते १५-२ धावांनी बाद झाले आहेत. या संघाला आयपीएलमध्ये खेळवावे लागेल."

सोशल मीडीयावर मीम्सचा पाऊस
एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, "आम्ही अर्ध्या जगाचे कर्जदार आहोत. त्यामुळे आम्हाला कर्ज दिलेले देश भारताला आपल्यावर हल्ला करू देणार नाही, सर्वजण झोपी जा." अजून एका वापरकर्त्याने लिहिले आहे की सिंधू नदीचे पाणी आडवले. पण पाकिस्तानात पूर्वीपासून पाणी येत नाही. पाणी अडवून काय होणार? अनेक वापरकर्त्यांनी पाकिस्तानातील विनोदी व्हिडीओही शेअर केले आहेत. भारताशी लढताना पाकिस्तानचा टिकाव लागणार नाही, असे या वापरकर्त्याला म्हणायचे आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.