Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

क्लायंट कोणाचा? यावरुन कोर्टात वकिलांमध्ये तुफान हाणामारी, महिला वकिलही भिडले

क्लायंट कोणाचा? यावरुन कोर्टात वकिलांमध्ये तुफान हाणामारी, महिला वकिलही भिडले
 

वकील मंडळी म्हणजे कायद्याचे रक्षणकर्ते मानले जातात, कायद्याचं पुस्तक हातात असावं पण कायदा त्यांनी कधीही हातात घेऊ नये, असा संकेतही आहे. पण हेच वकील जेव्हा भर कोर्टात एकमेकांना भिडतात आणि तुफान हाणामारी करतात तेव्हा आपले हे समज गळून पडतात. वकिलांच्या या हाणामारीची व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. दिल्लीच्या एका कोर्टात हा प्रकार घडला आहे. दिल्लीच्या कृष्णा नगर येथील विशेष कार्यकारी दंडाधिकारी  न्यायालयात वकिलांच्या दोन गटांत तुफान राडा झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भर कोर्टात महिला आणि पुरुष वकील चप्पल आणि नेम प्लेटने एकमेकांना मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




क्लायंट कोणाचा?  यावरुन राडा
दरम्यान, क्लायंट कोणाचा यावरुन या दोन गटांमध्ये हा राडा पाहायला मिळाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला नंतर बाचाबाची झाली पुढे वाद विकोपाला गेल्यानं थेट वस्तू घेऊन एकमेकांना मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यावेळी एका महिला वकिलानं दुसऱ्या वकिलाला चप्पलेनं मारलं. तर पुरुष वकिलांपैकी एकानं दुसऱ्याला स्टीलच्या नेम प्लेटनं मारलं. परिणामी त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जमिनीवरही रक्त सांडलेले दिसत आहे. व्हिडिओमध्ये महिला वकिलालाही मारहाणीनंतर रक्तस्त्राव होताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये वकिलांचे पांढरे शर्ट फाटलेले आणि रक्ताने माखलेले दिसत आहेत. याप्रकरणी दोन्ही पक्षांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून हत्येचा प्रयत्न आणि दरोड्याचा प्रयत्न या कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.