Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर :-संतापजनक! पोलिसाने जबाब घेण्याच्या बहाण्याने मुलीच्या छातीवरून हात फिरवला

कोल्हापूर :- संतापजनक! पोलिसाने जबाब घेण्याच्या बहाण्याने मुलीच्या छातीवरून हात फिरवला
 

कोल्हापूर : कोल्हापुरात एका हॉस्पिटलमध्ये जबाब नोंदवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसाच्या विकृत कृत्याने शहर हादरले आहे.

तू माझी मैत्रीण आहेस, म्हणत... अश्लील वर्तन
हॉस्पिटलमध्ये जबाब घेण्यासाठी गेल्यावर अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक चेतन घाटगे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटगे याने "तू माझी मैत्रीण आहेस, काही अडचण आल्यास मला फोन कर" असे सांगत पीडित मुलीच्या छातीवरून हात फिरवला, असे तक्रारीत म्हटले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चेतन घाटगे यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.