पेट्रोल पंपावर पाणी, गाडीच्या चाकात हवा आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधा ग्राहकांना मिळायलाच हव्यात, असा नियम आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंप चालक या नियमांकडे दुर्लक्ष करतात. अशा दुर्लक्षित व्यवस्थेमुळे ग्राहकांना होणारा त्रास आणि नियमांचे उल्लंघन किती महागात पडू शकते, याचे एक उदाहरण पुण्यात घडले.
जागरूक नागरिकाची तक्रार आणि दंडात्मक कारवाई
पुण्यातील
कोंढवा रोडवरील "ईश्वर सर्व्हिस स्टेशन" या बीपीसीएल पेट्रोल पंपावर
स्वच्छतागृह स्वच्छ नव्हते आणि मोफत हवा उपलब्ध नव्हती. हे लक्षात घेऊन
प्रफुल्ल सारडा या पुणेकराने तक्रार दाखल केली. त्यांनी अनेक महिने हा
त्रास सहन केल्यानंतर बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ऑडिट
करून तपासणी केली आणि पेट्रोल पंप मालक नितीन ईश्वरलाल चहा याला तब्बल
60,000 रुपये दंड ठोठावला.
जागरूक नागरिकांची भूमिका महत्त्वाची
पेट्रोल पंपावर शुद्ध पाणी, स्वच्छतागृह आणि मोफत हवा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे नियम पाळले जात नाहीत. जर नागरिकांनी याकडे लक्ष दिले आणि वेळेवर तक्रार केली, तर पंप चालकांना दंड ठोठावला जाऊ शकतो आणि सेवा सुधारली जाऊ शकते असे प्रफुल्ल सारडा म्हणाले. तरी, प्रत्येकाने जागरूक राहून अशा गैरसोयीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, जेणेकरून ग्राहकांना योग्य सेवा मिळू शकेल आणि नियमांची अंमलबजावणी होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.