सांध्यांमध्ये वाढलेले युरिक अॅसिड क्षणार्धात होईल कमी! कोमट पाण्यात मिक्स करा 'हे' गुणकारी पदार्थ दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय बऱ्याचदा अचानक पाय सुजणे, पायांमध्ये वाढलेल्या वेदना, गुडघे
दुखणे, पायांमध्ये अचानक सूज येणे इत्यादीआरोग्यासंबंधित समस्या उद्भवू
लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर शरीरावर अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरातील विषारी घटक योग्य वेळी बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. पण युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. हे घटक सांध्यांमध्ये साचून राहिल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य - iStock)
युरिक अॅसिड वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना, संधिवात, किडनीला सूज येणे, मुतखडा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लाग्तात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर आहारात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांध्यांमध्ये वाढलेली युरिक अॅसिड कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोणत्या पेयांचे आणि पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीरात साचून राहिलेले युरिक अॅसिड क्षणार्धात बाहेर पडून जाईल.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासाठी कोमट पाण्यासोबत लिंबाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीराची पीएच पातळी संतुलित राहते, किडनीचे आरोग्य सुधारते आणि याशिवाय पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. सांध्यांमधील युरिक अॅसिड कमी करण्यासाठी लिंबू पाण्याचे नियमित सेवन करावे.अॅप्पल सायडर व्हिनेगरचे आहारात सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर टाकून मिक्स करून घ्या. या पाण्याचे उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात वाढलेली युरिक अॅसिडची पातळी कमी होईल. सांध्यांमध्ये वाढलेली सूज, रक्त शुद्ध राहणे, पचनसंस्था सुधारणे इत्यादी आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळतो.रोजच्या आहारात करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चेरीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. यामध्ये आढळून येणारे अँथोसायनिन नावाचे घटक शरीरासाठी आवश्यक ठरते. याशिवाय चेरीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. चेरी खाल्यामुळे संधिवात, सांध्यांमधील वेदना आणि इतर समस्यांपासून आराम मिळेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.