पुणे: राज्यात भूमिअभिलेख विभागांंतर्गत असलेल्या सहा महसुली विभागांत प्रलंबित असलेल्या 88 हजार मोजणी प्रकरणांपैकी आतापर्यंत सुमारे 63 हजार मोजणी प्रकरणे (75 टक्के) निकाली काढण्यात आली आहेत. सध्या केवळ 25 हजारांच्या आसपास प्रकरणे
प्रलंबित असून, तीदेखील एप्रिलअखेरपर्यंत निकाली काढण्याचे आदेश
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यानुसाार उद्दिष्ट
ठेवून भूमिअभिलेख विभागाने काम सुरू केले आहे.
राज्यात मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात नागपूर विभागाची आघाडी असून, त्यांनी सुमारे 92 टक्के प्रकरणे निकाली काढली आहेत. पुणे विभागात राज्यात सर्वात अधिक प्रकरणे (सुमारे 35 हजार) प्रलंबित होती. या विभागातील देखील 70 टक्के मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे. भूमिअभिलेख विभागाच्या अंतर्गत पुणे,
कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर हे महसुली विभाग आहेत. या
विभागाच्या अंतर्गत असलेल्या उपअधीक्षक कार्यालयातील प्रलंबित मोजणी
प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या
कार्यक्रमांतर्गत देण्यात आले होते.
त्यानुसार डिसेंबर 2024 या कार्यकाळातील मोजणी प्रकरणे मार्चअखेर निकाली काढण्यावर भूमिअभिलेख विभागाने लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार प्रलंबित असलेल्या मोजणी प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यावर अधिकारी, सर्व्हेअर यांनी भर दिला.- कमलाकर हट्टेकर, उपसंचालक, भूमिअभिलेख विभाग, पुणेराज्य शासनाने आखून दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत 31 डिसेंबर 2024 अखेरची शिल्लक प्रकरणे निकाली काढण्यात येत असून, आतापर्यंत सहाही महसुली विभागांतील एकूण 75 टक्के मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.