प्रसूतीसाठी शून्य खर्च ! सिझेरियन शस्त्रक्रिया देखील मोफत, आधी जाणून घ्या या सरकारी योजनेचे नियम व अटी
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरु केलेली सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना (SUMAN) ही गरोदर महिला, नवजात बालके आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे महिलांना मोफत, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा दिली जाते.
योजनेची उद्दिष्टे :
गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतींची वेळेवर तपासणी व उपचार मोफत करणे.
गरोदर महिलांना शून्य खर्चात सामान्य प्रसूती व शस्त्रक्रियेच्या (C-section) सुविधांचा लाभ देणे.
महिलांना आणि बालकांना आरोग्यसेवेत कोणतीही नकारात्मकता नसो, यासाठी "झिरो टॉलरन्स" धोरण लागू करणे.
प्रसूतीपूर्व तपासण्या (Antenatal Checkups), लसीकरण, स्तनपानासाठी योग्य जागा व सल्ला यांची हमी.
घर ते रुग्णालय आणि पुन्हा घरी नेण्याची मोफत वाहतूक सुविधा. नवजात बालकांसाठी आरोग्यसेवा, लसीकरण, आणि देखरेखीची व्यवस्था. योजनेचे फायदे :
शून्य खर्चः प्रसूती व शस्त्रक्रियेसह इतर आरोग्य सेवा मोफत मिळतात.
प्रसूतीपूर्व तपासण्याः महिलांना चार वेळा तपासणीची सुविधा, यामध्ये पहिल्या त्रैमासिकात एक तपासणी आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत एक तपासणी समाविष्ट आहे.
आरोग्य सुविधाः टिटॅनस-डिफ्थेरिया इंजेक्शन, आयर्न फॉलिक अॅसिड सप्लिमेंट, नवजात बालकांसाठी सहा वेळा घरी जाऊन सेवा.
मोफत वाहतूकः घर ते रुग्णालय आणि रुग्णालयातून घरी येण्याची मोफत सुविधा.
प्रशिक्षण व सल्लाः सुरक्षित मातृत्वासाठी मार्गदर्शन व जनजागृती (IEC/BCC) सेवा.
पात्रता :
सर्व श्रेणीतील गरोदर महिला (APL आणि BPL दोन्ही).
जन्मानंतर ० ते ६ महिने वयाची नवजात बालके.
प्रसूतीनंतर सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करणाऱ्या माता.
नोंदणी प्रक्रिया :
ऑफलाइन नोंदणीः आपल्या जिल्ह्यातील नागरी रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी. पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी केली जाते. कुठल्याही अडचणीसाठी SUMAN योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर तक्रार नोंदवता येते.
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र (ओळखपत्र म्हणून). गरोदरपणाची तपशीलवार माहिती (संबंधित रुग्णालयातून). पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, आधार कार्ड, वीज बील, टेलिफोन बील इत्यादी).
ही योजना गरोदर महिलांचे मृत्यू दर कमी करण्यासाठी व प्रसूतीनंतर योग्य देखरेख सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना सुलभ, सन्मानजनक व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.