राज्यामध्ये काही संघटना जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच राज्यातील ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकर यांनी थेट संभाजी ब्रिगेडवर
निशाणा साधत आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड असा जातीयवाद
पेटवत असल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला. पडळकर यांनी थेट संभाजी
ब्रिगेडवर निशाणा साधत आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड असा
जातीयवाद पेटवत असल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला.
पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना
गोपीचंद पडळकर म्हणाले, काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा
इतिहास मोडतोड करून लिहिला. मात्र त्यामध्ये बहिरजी नाईक, जीवा महाल, शिवा
काशिद यांच्याबाबत एक पान देखील लिहिलं गेलं नाही. बाजीप्रभू देशपांडे
यांचा इतिहास देखील चुकीचा आहे, हे बोलायला कमी करत नाहीत.
बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोहोचेपर्यंत प्राण सोडला नाही. मात्र, काही लोक मतांसाठी ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी कोणत्या थराला जात आहेत. हे महाराष्ट्रातील बहुजन समाज खपवू घेणार नाही. संभाजी ब्रिगेड मधील लोकांना माझा सवाल आहे की, तुमच्या आई-बापाचं लग्न ब्राह्मणांनी लावलं, मग त्यांनी बायको सोडायची का? तुमचं लग्न देखील ब्राह्मणांनी लावलं मग तुम्ही बायको सोडणार आहात का? तुमच्या घरभरणीची वास्तुशांती ब्राह्मणांनी केली मग तुम्ही घर पाडणार का?, असा सवाल पडळकर यांनी केला.सगळ्याच समाजामध्ये चांगले वाईट लोक असतात. मराठा समाजात देखील काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होते. त्या पद्धतीची प्रवृत्ती त्या समाजात देखील होती. परंतु इतर मराठा समाजातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ताकतीने लढत होते. म्हणून ती संपूर्ण जात चुकीची नसते. एखादा ब्राह्मण चुकीचा असू शकतो म्हणून सगळ्यांना शिव्या देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर वाद पेटवून राजकारणात पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे. हा धंदा महाराष्ट्रातील बहुजनांच्या मुलांनी ओळखलेला आहे. तसेच भविष्यात देखील बहुजन समाजाच्या मुलांनी अशा राजकारणापासून सावध राहण्याची गरज असल्याचे पडळकर म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.