Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; विशाल पाटलांना लागले मंत्रि‍पदाचे वेध; भाजप प्रवेशाबद्दल सूचक विधान

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; विशाल पाटलांना लागले मंत्रि‍पदाचे वेध; भाजप प्रवेशाबद्दल सूचक विधान
 

राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असतानाच सांगलीत देखील मोठा धक्का पचवावा लागला होता. ठाकरे गटातील शहरप्रमुखच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेला. ही घटना ताजी असतानाच आता काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये जाऊन मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. काँग्रेसला पाठिंबा दिलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकताच एका कार्यक्रमात, भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. शिवाय जसे गोरेंना मंत्रिपद मिळाले तसे मला देखील मिळेल, असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे आता सांगली जिल्ह्यासह काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

काहीच दिवसांच्या आधी सांगलीतील एका पत्रकार परिषदेत भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तसेच आमच्याकडे या विकासासाठी निधी आणि पद मिळेल असेही त्यांनी म्हटलं होतं. पण यावर आपण योग्य वेळ आल्यावर यावर उत्तर देऊ असे विशाल पाटील यांनी सांगत या भाजप प्रवेशाच्या चर्चेतून अंग काढलं होतं.

पण आता त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून भाजप नेते गोरे यांना जसे मंत्रिपद मिळाले तसेच आपल्याला देखील मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे. तर हे वक्तव्य करताना त्यांनी आपण भविष्यात काँग्रेस सोबत असणार नाही असे, म्हणत भाजप प्रवेशावर सूचक वक्तव्य केलं आहे. विशाल पाटील यांनी, आपण भविष्यात काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाऊ असे वक्तव्य केल्याने त्याच्या या वक्तव्याची जिल्ह्यात चर्चा होत आहे. तर या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. शिवाय ते चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ऑफर स्वीकारली तरी नाही ना अशीही चर्चा आता रंगली आहे.
 
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटल यांनी आपल्याला पण मंत्रिपद मिळावं, अशी भावना बोलून दाखवली. पण यावेळी त्यांनी भाजपमध्ये गेलेले यावेळी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले, हा योगायोग म्हणावा लागेल की मी पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो. तर गोरे सुद्धा अपक्ष आमदार झाले होते. पण ते नंतर भाजपवासी झाले आणि आता मंत्री झाले आहेत. त्यामुळे आता आम्हालाही मंत्री व्हावं वाटतं आहे. त्यांनी केलेल्या या सुचक वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून पाटील भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना? अशी चर्चा सांगली जिल्ह्यात सुरू झाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.