Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुगंधी तंबाखूची बेकायदा वाहतूक करणाऱ्याला अटक : सांगली एलसीबीची कारवाई

सुगंधी तंबाखूची बेकायदा वाहतूक करणाऱ्याला अटक  : सांगली एलसीबीची कारवाई
 

बेकायदा सुंगधी तंबाखू घेऊन जाणारी कार पकडून एकाला अटक करण्यात आली. यावेळी सुगंधी तंबाखू व कारसह 9 लाख 61 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. निलेश तानाजी लिगाडे (वय 26, रा. दहावी गल्ली दत्तनगर सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अवैध गुटखा व सुगंधी तंबाखु तस्करी, साठा, विक्री, वाहतुक, व वितरण करणाऱ्यांवर कारवाईसाठी निरीक्षक सतिश शिदे यांनी सहायक निरीक्षक सिंकदर वर्धन यांचे एक पथक केले होते. त्या पथकाला शहरात काळी खण परिसरात सुगंधी तंबाखू विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार सापळा रचून या पथकाने कार अडवून झडती घेतली असता त्या गाडीत सुगंधी तंबाखू असल्याचे निदर्शनास आले.

संबधित तरूणास त्या सुगंधी तंबाखूचे बिल, वाहतूकीचे कारण आदीबाबत काहीच माहीती देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी गाडीतील सुगंधी तंबाखू असणाऱ्या सर्व गोण्या व गाडी जप्त केली. जप्त केलेल्या गोण्यामध्ये विविध कंपनीची सुगंधी तंबाखू, एक मोबाईल, कार (एमएच 10 ईए 6769) जप्त करण्यात आली. निलेश लिगाडे याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरिक्षक सिकंदर वर्धन, नितिन सावंत्त, अनिल ऐनापुरे, सूर्यकांत साळुंखे, आमसिध्द खोत, संजय पाटील, हणमंत लोहार, अतुल माने, अरूण पाटील, उदय माळी, रणजीत जाधव, रोहन गस्ते, अभिजित ठाणेकर, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.