Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला जन्मठेप

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला जन्मठेप
 

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात अखेर न्यायायलयाने निकाल दिला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उर्वरीत दोन आरोपींना 7 वर्षांची शिक्षा सुनावली. कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर या दोघांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली. पण या दोन आरोपीची शिक्षा पूर्ण झाल्याने त्यांना तुरुंगातून सोडण्याचे कोर्टाचे आदेश. अटक झाल्यापासून 7 वर्षांच्या कालावधीत आरोपी तुरुंगात असल्याने दोन आरोपींची शिक्षा पूर्ण झाली. त्यांची रिलीज ऑर्डर काढण्यात येणार. अश्विनी बिद्रे यांच्या पतीने राजू गोरे यांनी आरोपींकडून भरपाई नको असे सांगितले होते. त्यामुळे तसा आदेश काढण्यात आलेला नाही.

सरकारला कोर्टाकडून सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांच्या पगाराची भरपाई देण्यात यावी. ज्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला त्यांच्यावरही कारवाई करावी असा नवी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात आला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. अधिकाऱ्यांवर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस. तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनीही यामध्ये दुर्लक्ष केल असल्याचे कोर्टाचे मत आहे. आरोपींविरोधात कारवाई न करता, चौकशी न करता आरोपींच्या राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करणारे अधिकारी अडचणीत आले आहेत. या निकालाविरोधात वरच्या कोर्टात दाद मागण्यासाठी आरोपींना तीन दिवसांची मुभा देण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.