माजलगाव : ५० हजाराच्या लाच प्रकरणी माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील वीज वितरणाच्या अभियंत्याससह लाईनमन व एका खाजगी इसमाला अटक करण्यात आली. वीज चोरीचा दंड न टाकण्यासाठी ही लाचेची मागणी करण्यात आली होती. महावितरणचे कार्यकारी उपअभियंता विवेक
जनार्धन मवाडे, वायरमन शेख जलील शेख अब्दुला, खाजगी इसम मोमीन मोहीब, अशी
लाचखोरांची नावे आहे. त्यांच्याविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे तक्रारदाराचे चहापाण्याचे हॉटेल आहे. त्यांचे मीटर जळाल्यामुळे वायरमनच्या परवानगीने दुसरीकडून लाईट घेतली. ही बाब वायरमनने कार्यकारी उपअभियंता यांना सांगून दंडाची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्लॅन बनवला. त्याप्रमाणे हॉटेलची झडती घेऊन वीजचोरी पकडण्यात आली. पावणे दोन लाख रुपये दंडाची भीती दाखवून तक्रारदारकडून तडजोडीअंती ५० हजार रुपये स्विकारण्याचे तिघांनी मान्य केले. तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी माजलगाव लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार ५० हजाराची लाच स्विकारून लाईनमन याने ती रक्कम खाजगी इसमाकडे देत असताना त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ही रक्कम कार्यकारी उपअभियंता याच्या सांगण्यावरून घेतल्याची कबुली लाईनमन याने दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.