Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वडर कॉलनी सांगली येथे विमुक्त भटक्या जातींसाठी जात प्रमाणपत्राच्या वाटपाबाबत विशेष शिबिर

वडर कॉलनी सांगली येथे विमुक्त भटक्या जातींसाठी जात प्रमाणपत्राच्या वाटपाबाबत विशेष शिबिर
 


 

 शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत वडर ,माकडवाले,नंदीवाले ,रामोशी,अशा विमुक्त भटक्या जातींसाठी दाखले वाटपाचा कार्यक्रम दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सांगली येथे घेण्यात येणार आहे. सदर शिबीराच्या अनुषंगाने सदर शिबिराची पूर्वतयारी म्हणून मार्चमध्ये तीन दिवसाच्या शिबिरामध्ये 1000 जातीच्या दाखल्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते सांगली मधील विमुक्त भटक्या जातीतील विशेषता वडर, माकडवाले, नंदीवाले, रामोशी अशा 1000 लोकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला होता माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे सर आणि माननीय उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दाखल्यांचे प्राथमिक स्वरूपात वाटप व नवीन अर्ज घेण्याचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी आयोजित केलेले आहे तरी सदर शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन तहसिलदार सांगली अश्विनी वरूटे अडसूळ यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.