कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा दावा करणाऱ्या PSI वर गुन्हा दाखल; अटकेसाठी शोध सुरु
बीड : येथील सायबर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रणजित कासले याने आपल्या सोशल मीडिया अकांऊटवर जातीय वक्तव्य करून भावना दुखावल्या. याप्रकरणी बीडमधील एका वकिलाच्या फिर्यादीवरून कासले विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या अटकेसाठी एक पथकही रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
रणजीत कासले याची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती होती. मार्च महिन्यात तो एक आरोपी आणि दोन कर्मचाऱ्यांना घेऊन गुजरातमध्ये गेला. तेथे गेल्यानंतर कोट्यवधी रूपयांची डील केल्याचा आरोप त्याच्यावर झाला. याची तक्रार येताच पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याची चौकशी केली. त्यानंतर त्याला निलंबित केले होते. तेव्हापासून तो सोशल मीडियावर सक्रिय होता. वेगवेगळ्या ठिकाणी जावून त्याने व्हिडीओ बनवत ठाणेदार ते अपर पोलिस महासंचालक आणि राजकीय नेत्यांवरही गंभीर आरोप केले होते.
अनेक व्हिडीओमध्ये तो दारू पिल्याचीही कबुली देत होता. असाच एक व्हिडीओ बनवत असताना त्याने जातीय वक्तव्य करून विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे बीडमधील एका वकिलाने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून उपनिरीक्षक कासले विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रार येताच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पीएसआयच्या कुटूंबातील लोकांशी चौकशी केली आहे. अद्याप अटक नाही -नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.