Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1.5 लाख पगार पण आता Zomato डिलीवरी करण्याची आली वेळ

1.5 लाख पगार पण आता Zomato डिलीवरी करण्याची आली वेळ


Zomato वरुन घाईच्या वेळी, डबा नसताना अनेकदा ऑर्डर केली जाते. ऑर्डर करणे आणि डिलिवरी बॉय आपलं सामान नेऊन देणे ही अतिशय सामान्य बाब आहे. पण जेव्हा एक व्यक्ती आपल्या प्रामाणिकपणे सगळ्यांच मन जिंकतो तेव्हा...

अशीच ही हृदयस्पर्शी गोष्ट श्रीपाल गांधी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे. ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे.

नेमकं काय झालं?

श्रीपाल गांधी यांनी सबवेवरुन ऑर्डर केली. ज्यामध्ये त्यांनी सँडविच, कुकीज आणि चिप्स होते. पण जेव्हा ऑर्डर आली तेव्हा त्यामध्ये फक्त सँडविच असल्याच आढळले. त्यांनी डिलिवरी करणाऱ्या व्यक्तीला सांगितले की, चिप्स आणि कुकीज पण ऑर्डर केले होते. तेव्हा ती व्यक्ती थोंडी गोंधळली आणि नम्रपणे सांगू लागली की, सर कृपा करुन तुम्ही रेस्टॉरंट किंवा झोमॅटोवर फोन केला.

तेव्हा त्यांना सबवेमधून कळलं की, चुकून त्या दोन गोष्टी तिथेच राहिल्यात. 20 रुपये एक्स्ट्रा देऊन डिलिवरी बॉयला पुन्हा पाठवण्यास सांगितलं. त्यावेळी त्या व्यक्तीने नम्रपणे सांगितलं की, आम्हाला जो पगार मिळतो तो झोमॅटोकडून मिळतो. त्यामुळे जोपर्यंत झोमॅटो सांगत नाही तोपर्यंत त्याला पुन्हा जाणे गरजेचे नव्हते. पण डिलिवरी करणाऱ्या व्यक्तीने आपली ग्राहकाला कामातून समाधान देण्याचं काम करतो. त्यामुळे कोणतीही तक्रार न करता ती व्यक्ती पुन्हा रेस्टॉरंटमध्ये गेला. एवढंच नव्हे तर त्याने 20 रुपये घेण्याचेही नाकारले. या व्यक्तीने जेव्हा आपल्या आयुष्याची करुण कहाणी सांगितली तेव्हा मात्र श्रीपाल गांधी अचंबित झाले.

एकेकाळी होता 1.5 लाख पगार, मग काय झालं?

फक्त एक वर्षापूर्वी ही व्यक्ती अनेकांच्या मते स्वप्नवत जीवन जगत होता. एका प्रतिष्ठित आयटी फर्ममध्ये स्थिर नोकरी आणि ₹१.२५ लाख मासिक पगार होता. अगदी आपल्या कुटुंबासोबत छान जीवन जगत होते.त्यांच्या दोन हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुली त्यांचा अभिमान आणि आनंद होत्या. त्यांनी मुलींना सर्वोत्तम शाळांमध्ये पाठवण्याचे आणि त्यांना कधीही न मिळालेल्या प्रत्येक संधी देण्याचे स्वप्न पाहिले.

पण नशिबात काही तरी वेगळंच होतं. एका भयानक रस्ते अपघातात या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आणि त्यामध्ये एक हात आणि पायाला लकवा मारला. यानंतर नोकरी मिळेल असं वाटत नव्हतं. पण झोमॅटोने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला नोकरी दिली.

या व्यक्तीने सांगितलं की, त्यांची मुलगी शिक्षण घेत आहे. तिच्या अभ्यासाच्या खर्चा करीता पैसे लागतात. त्यामुळे ते हे काम करत असल्याचं सांगितलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.