डिजिटल युगात स्मार्टफोन हे केवळ बोलण्यासाठीच नव्हे, तर काम, बँकिंग, मनोरंजन, आणि सोशल मीडियासाठी अत्यावश्यक साधन बनले आहे. मात्र या स्मार्टफोनचा एक मोठा त्रास म्हणजे त्याची बॅटरी लवकर संपणे. सकाळी १००% चार्ज करून निघालेला फोन संध्याकाळपर्यंत दमतो, आणि चार्जिंग पॉइंटचा शोध सुरू होतो. अनेक वेळा प्रवासात किंवा महत्त्वाच्या कॉलवेळी बॅटरी संपल्याने मोठी अडचण होते.
अशा वेळी अनेकांना माहित नसलेली पण अत्यंत उपयुक्त अशी एक सुविधा आहे, Battery Saver Mode. काही मोबाईलमध्ये हा मोड Power Saving Mode या नावानेही दिसतो. हा मोड ऑन केल्यावर फोन स्क्रीनचा ब्राइटनेस कमी करतो, बॅकग्राउंड अॅप्स थांबवतो, सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सवर मर्यादा घालतो, आणि प्रोसेसरचा वेग थोडा कमी करतो. यामुळे फोनची बॅटरी साठवून ठेवली जाते आणि त्याचा वापर अधिक काळ करता येतो. नेहमीच्या वापरात बॅटरी जिथे १ दिवस चालते, तिथे १.५ ते २ दिवस सहज टिकते.
कसा ऑन कराल हा मोड ?
हा मोड वापरणं अतिशय सोपं आहे. फक्त Settings > Battery किंवा Power विभागात जाऊन 'Battery Saver' किंवा 'Power Saving Mode' हा पर्याय शोधा आणि ऑन करा. काही स्मार्टफोनमध्ये हा मोड क्विक टॉगल पॅनलमध्ये सुद्धा असतो, ज्यामुळे एका टचमध्ये तो सुरू करता येतो. प्रवास करताना, बॅटरी कमी शिल्लक असताना किंवा दिवसभर चार्जिंगची सोय नसेल, तेव्हा हा मोड अत्यंत उपयोगी ठरतो.
फोन वापरताना बॅटरी लवकर उतरू नये म्हणून काही अतिरिक्त टिप्स
बॅटरी ०% होईपर्यंत वापरणं टाळा आणि १००% चार्ज करून वारंवार वापरणेही टाळा. २०% ते ८०% यामध्ये चार्जिंग राखणं बॅटरीच्या दीर्घायुष्यासाठी फायदेशीर असते. तसेच, चार्जिंग करताना फोनचं कव्हर काढल्यास गरमी कमी होते आणि चार्जिंग कार्यक्षमतेने होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.