Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

22 की 18 कॅरेट हात न लावताही ओळखा शुद्ध सोनं? सोनार कधीही सांगणार नाही ही ट्रिक

22 की 18 कॅरेट हात न लावताही ओळखा शुद्ध सोनं? सोनार कधीही सांगणार नाही ही ट्रिक
 

सोन्याची खरेदी करताना मनात असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. सोनं खरं आहे की नाही. आपण जे सोनं खरेदी करत आहोत ते खरं आहे की नाही? विश्वासार्ह दुकानातून खरेदी करतानाही असे अनेक प्रश्न असतात.

पण आज आम्ही तुम्हाला असे काही ट्रिक सांगणार आहोत. ज्याने तुम्ही एकदम शुद्ध सोनंच खरेदी कराल. ही ट्रीक तुम्हाला सोनारही कधी सांगणार नाही. आपल्या कानावर अनेकदा अशी माहिती येते की, 22 कॅरेट सोन्याच्या बदल्यात 18 कॅरेट सोनं विकल जातं. ज्यानंतर ग्राहकाला आपली फसवणूक झाल्याची माहिती फार उशिरा होते. अशावेळी ही ट्रिक तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरते. आपल्याला फक्त सोने खरेदी करताना नंबर आणि हॉलमार्ककडे लक्ष द्यायचं आहे. अशा पद्धतीने सोने खरेदी केल्यावर तुमची कधीच फसवणूक होणार नाही.
माहिती लिहूनच घ्या

सोनं खरेदी करताना ग्राहकांनी सगळ्यात आधी BIS हॉलमार्क आहे की नाही याची पडताळणी करावी. हॉलमार्कवरुन कळतं की, सोन्याची शुद्धता किती आहे. सरकारने प्रमाणित केलेली ही माहिती आहे. 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.6% सोन्याची शुद्धता असते. यावर 22K916 असे लिहिलेले असते. ही माहिती जर दागिन्यावर नसेल तर सोनं शुद्ध नसल्याची माहिती होते. तेथेच 750 किंवा 18K लिहिलं असेल तर याचा अर्थ आहे की, सोनं 18 कॅरेटचं आहे.

हे नंबर देखील पाहा
याशिवाय, ग्राहक प्रत्येक हॉलमार्क दागिन्यांवर नमूद केलेला लूम नंबर (ज्वेलर्स आयडेंटिफिकेशन नंबर) देखील तपासू शकतात. यावरून ज्वेलर्स BIS मध्ये नोंदणीकृत आहे की नाही हे दिसून येते. याद्वारे, उत्पादन पातळीपर्यंतचे तपशील ज्ञात होतात. राजेश कुमार म्हणाले की, आजकाल अनेक ज्वेलर्स हॉलमार्कसारख्या बनावट सीलचा वापर करून ग्राहकांना गोंधळात टाकतात, त्यामुळे योग्य पावती आणि बिल घेणे अनिवार्य आहे. बिलात कॅरेट, वजन, मेकिंग चार्जेस आणि कर यासारखी सर्व माहिती स्पष्ट असावी. जर ग्राहकांची इच्छा असेल तर ते प्रमाणित सोन्याची चाचणी करणाऱ्या यंत्राद्वारे दागिन्यांची तपासणी देखील करू शकतात, जे आता अनेक नामांकित दागिन्यांच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.