55 बँकांनी एकत्र येऊन मुकेश अंबानींना दिले 242150000000 रुपयांचे जगातील सर्वात मोठे कर्ज ? एवढ्या पैशांचे अंबानी काय करणार?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला भारतातील सर्वात मोठे परदेशी कर्ज मिळाले आहे. 2.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे हे कर्ज आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हे एका वर्षात भारताने घेतलेले सर्वात मोठे परदेशी कर्ज आहे. सुमारे 55 बँकांनी मिळून हे कर्ज दिले आहे. ब्लूमबर्गच्या सूत्रांनुसार, या वर्षी आशियातील एखाद्या कंपनीला बँक समूहाने दिलेले हे सर्वात मोठे सिंडिकेटेड कर्ज आहे. सिंडिकेटेड कर्ज म्हणजे जेव्हा अनेक बँका एकत्रितपणे एकाच कंपनीला कर्ज देतात.
या कर्जाची जागतिक स्तरावर जोरदार चर्चा सुरु आहे. अंबानीना दिलल्या कर्जावरुन बँका बाजारात चांगल्या कंपन्यांना कर्ज देण्यास तयार आहेत. जपान वगळता आशिया पॅसिफिक प्रदेशात कर्जाचे प्रमाण 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरले आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत फक्त 29 अब्ज डॉलरचे सौदे झाले आहेत. हे सौदे डॉलर, युरो आणि येनमध्ये आहेत, ज्यांना G3 चलने देखील म्हणतात.
ब्लूमबर्गच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजला हे कर्ज दोन भागात देण्यात आले आहे. एकाची किंमत 2.4 अब्ज डॉलर आहे. तर, दुसरे कर्ज 67.7 अब्ज येन म्हणजेच सुमारे 462 दशलक्ष डॉलर इतके आहे. हा करार 9 मे रोजी झाला. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजला 2025 मध्ये व्याजासह सुमारे 2.9 अब्ज डॉलर्स द्यावे लागणार आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे रेटिंग भारत सरकारच्या रेटिंगपेक्षाही चांगले आहे. एखाद्या कंपनीचे रेटिंग तिच्या देशापेक्षा चांगले असते असे क्वचितच घडते. मूडीज रेटिंग्जने रिलायन्सला Baa2 रेटिंग दिले आहे आणि फिच रेटिंग्जने BBB रेटिंग दिले आहे. याचा अर्थ असा की कर्ज परतफेड करण्यात रिलायन्सला कोणतीही अडचण येणार नाही. बँका आणि गुंतवणूकदार रिलायन्सला सुरक्षित मानतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.