Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी! तब्बल 9 हजार 970 पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी! तब्बल 9 हजार 970 पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

 

असंख्य तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि इंटरनेटपासून वर्तमानपत्रांपर्यंत तसेच वेबसाईटवरही ते नोकरी शोधत असतात. नोकरी, रोजगाराच्या शोधात असलेल्या अशा तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आहे. रेल्वे भरती मंडळ RRB ने सहायक लोको पायलट (ALP) भरती 2025 साठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली आहे. आता इच्छुक उमेदवार त्यांच्या प्रादेशिक RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. मंडळाने केवळ नोंदणीची तारीखच वाढवली नाही तर अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीखही वाढवली आहे.

 

रेल्वे सहायक लोको पायलटसाठी अर्जाची शेवटची तारीख काय?

आरआरबी असिस्टंट लोको पायलटच्या 9 हजार 970 पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, जी पूर्वी 11 मे 2025 होती, ती आता 19 मे 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. शुल्क भरणे आणि फॉर्म दुरुस्तीसाठी दुरुस्ती विंडो 14 मे ते 22 मे पर्यंत खुली असेल.

कोणत्या विभागात किती जागा?

रेल्वे भरती मंडळाने (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) साठी झोननिहाय रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध केली आहे.

(विभाग) (रिक्त जागा)

मध्य रेल्वेमध्ये - 376 पदांसाठी भरती
पूर्व रेल्वेमध्ये - 868 पदांसाठी भरती
दक्षिण रेल्वेमध्ये - 510 पदांसाठी भरती
पश्चिम रेल्वेमध्ये - 885 पदांसाठी भरती
उत्तर रेल्वेमध्ये - 521 पदांसाठी भरती
दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये - 921 पदांसाठी भरती
ईशान्य फ्रंटियरच्या 125 पदे

ईशान्य फ्रंटियरच्या 125 पदांसाठी, पूर्व मध्य रेल्वेच्या 700, पदांसाठी, उत्तर मध्य रेल्वेच्या 508 पदांसाठी, पश्चिम मध्य रेल्वेच्या 759 पदांसाठी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या 568 पदांसाठी, दक्षिण मध्य रेल्वेच्या 989 पदांसाठी, ईशान्य रेल्वेच्या 100 पदांसाठी, उत्तर पश्चिम रेल्वेच्या 679 पदांसाठी आणि मेट्रो रेल्वे कोलकातामध्ये 225 पदांसाठी भरती होणार आहे. या भरतींसह, रेल्वे एकूण 9,970 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती करणार आहे.

 

'या' पदांसाठी काय आहेत पात्रता?

रेल्वेत सहायक लोको पायलट भरती 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचे आयटीआय प्रमाणपत्र किंवा एनसीव्हीटी/एससीव्हीटी असणे आवश्यक आहे.

यापैकी एक डिप्लोमा असणे आवश्यक

इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ/टीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिकल (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक यामध्ये डिप्लोमा आवश्यक आहे.

किंवा उमेदवाराने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून यापैकी कोणत्याही दोन किंवा अधिक विषयांमध्ये प्रमाणपत्रासह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.