Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धुळे कॅश प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा अन् पहिली विकेट पडली! आमदार अर्जून खोतकरांचा कक्ष अधिकारी...

धुळे कॅश प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा अन् पहिली विकेट पडली! आमदार अर्जून खोतकरांचा कक्ष अधिकारी...
 

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळाच्या अंदाज समितीमधील आमदारांना पाच कोटींचे वाटप करण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. गोटे यांनी धुळे विश्रामगृहाच्या ज्या खोलीत पैसे ठेवले होते त्याला कुलूप लावले होते. पोलिस अधिकारी तेथे आले त्यांनी पैशाची मोजणी देखील केली. एक कोटी 84 लाख रुपये खोलीत ठेवल्याचे पोलिसांना आढळले. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले. फडणवीसांच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांमध्ये धुळे विश्रामगृहाची खोली ज्या कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्या नावावर बूक होती. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले. किशोर पाटील हे कक्ष अधिकारी आहेत तसेच ते आमदार अर्जून खोतकर यांचे स्वीय सहायक आहेत. खोतकर हे अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत.

पोलिसांनी खोलीतील पैसे मोजण्यासाठी मशिन मागवली होती. पोलिसांच्या तपासणीत खोलीमध्ये तब्बल एक कोटी 84 लाखांची रोकड सापडली आहे.मात्र, अनिल गोटे यांनी खोलीमध्ये पाच कोटी रुपये होते बाकी पैसे लंपास करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी होणार नाही, असे सांगितले.

तुकाराम मुंडेंच्या मार्फत चौकशी करा

अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केलेल्या एसआयटी चौकशीवर संशय व्यक्त केला. ते म्हणाले, याप्रकरणाचा तपास प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मार्फत झाला पाहिजे. या प्रकरणाचा तपास तुकाराम मुंढे अथवा नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी करावा. त्यात राहुल रेखावार या सनदी अधिकाऱ्याचा समावेश करण्यात यावा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.