Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू

दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
 

पुढच्या दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल, असा धमकीचा ईमेल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. या धमकीच्या ईमेलनंतर मुंबईसह अनेक शहरांमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रशासनाने या धमकीला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा ईमेल मिळाला आहे. या मेलमध्ये असे म्हटले आहे की, पुढील २ दिवसांत एक मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. नियंत्रण कक्षाने हा मेल मुंबई पोलिसांना पाठवला आहे . ईमेल मिळाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलीस झाले सतर्क
मुंबई पोलीस प्रशासनाने या ईमेलला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे. सध्या पोलीस सदर ईमेल आयडी ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. ईमेल पाठवणाऱ्याचे स्थान देखील अद्याप ट्रॅक झालेले नाही. मात्र, यानंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसोबतच, ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचाही शोध घेतला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.