महाराष्ट्रावर संकट; 'शक्ती' चक्रीवादळाचा धोका वाढला, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? वाचा सविस्तर
महाराष्ट्राला 'शक्ती' चक्रीवादळाचा संभाव्य धोका वाढल्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सातारा अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पाऊस तर ठाण्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने काय इशारा दिला?
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचे धुम:श्चान होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळाल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात संतताधर पावसाला सायंकाळनंतर सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई, पालघरमध्ये आज मुसळधार पाऊस होईल. साताऱ्यातील घाट परिसरात पूरजन्य परिस्थितीत निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागांत रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच या पावसाचे प्रमाण जास्त दिसून येईल.कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन-चार दिवसांत पाऊस धुमाकुळ घालणार आहे. ठाण्यात आजपासून तर मुंबईत आणि पालघरमध्ये उद्यापासून अतिवृष्टीला सुरुवात होईल. रायगड जिल्ह्याला उद्या अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीत आज आणि उद्या रेड अलर्ट राहील. दोन्ही जिल्ह्यांत पावसाचा जोर २५ मेर्यंत कायम राहील. सिंधुदुर्गात सलग पाच दिवस अतिवृष्टी होईल.पुणे, सातारा, अहिल्यानगर, कोल्हापूरातील घाट परिसरात दोन दिवस अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणी, बीड,नांदेड आणि लातूर येथे आज तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवसांत ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहत असल्याने सर्वांनी काळजी घ्या, असेंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.