Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली:- जत तालुक्यात सोळा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; रात्री घरी कोणी नसल्याचं पाहिलं अन् तिच्यावर..

सांगली:- जत तालुक्यात सोळा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; रात्री घरी कोणी नसल्याचं पाहिलं अन् तिच्यावर..
 

जत : जत तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर कामाच्या निमित्ताने बोलावून घेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी (ता. १६) रात्री ही घटना घडली. पीडित मुलीने आईला घटनेची माहिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत मुलीच्या आईने जत पोलिस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका सतरा वर्षीय मुलावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले असून सांगली येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयिताने रात्री घरी कोणी नसल्याने पीडित मुलीला कामाचे निमित्ताने बोलावून घेतले.


तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने तिच्या आईला झालेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर रविवारी सायंकाळी जत पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला सांगली येथील बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लातुरे करत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.