कुठल्या जिल्ह्यात मॉकड्रील होणार ? सायरन वाजल्यावर काय कराल? सायरन कुठे लागणार?
केंद्र सरकारने संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी आणि पाकिस्तान सोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहे.
स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल.
उद्या 7 मे रोजी ही मॉकड्रील होणार आहे. या दरम्यान नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा, ते ट्रेनिंग दिलं जाईल. सिविल डिफेंस म्हणजे नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या मॉक ड्रीलमागे उद्देश आहे. देशात शेवटची मॉक ड्रील 1971 साली झाली होती.
ही मॉक ड्रील 244 सिविल डिफेंस डिस्ट्रिक्टमध्ये (नागरिक सुरक्षा जिल्हा) होणार आहे. सिविल डिफेंस कायदा 1968 संपूर्ण देशात लागू आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेशी जोडलेल्या 244 जिल्ह्यात मॉक ड्रीलची योजना आहे. हे जिल्हे भारत-पाकिस्तान सीमेशी जोडलेले आहेत. यात जम्मू कश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाब सारख्या राज्यातील जिल्हे येतात. या राज्यांच्या सीमा पाकिस्तानला लागून आहेत. त्या शिवाय अशीही काही संवेदनशील शहरं आहेत, ज्यांना सिविल डिफेंस डिस्ट्रिक्टमध्ये परावर्तित करण्यात आलं आहे.
सायरन कुठे-कुठे लागणार?
सरकारी भवन
प्रशासनिक भवन
पोलीस मुख्यालय
फायर स्टेशन
सैन्य ठिकाणं
शहरातील मोठे बाजार
गर्दीच्या जागा
सिविल मॉक ड्रिलमध्ये कोण-कोण?
जिल्हाधिकारी
स्थानीय प्रशासन
सिविल डिफेंस वार्डन
पोलिसकर्मी
होम गार्ड्स
कॉलेज-स्कूल विद्यार्थी
नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC)
नॅशनल सर्विस स्कीम (NSS)
नेहरू युवा केंद्र संगठन (NYKS)
सायरन वाजल्यावर काय करालं?
तात्काळ सुरक्षित आश्रयस्थळी जालं.
5 ते 10 मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा.
सायरन वाजल्यानंतर घाबरुन जाऊ नका.
फक्त मोकळ्या जागेपासून लांब रहा.
घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आत प्रवेश करा.
टीव्ही, रेडियो, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.
अफवावर विश्वास ठेऊ नका प्रशासनाच्या सूचनांच पालन करा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.