कोयत्याने सपासप वार करत गर्लफ्रेंडची हत्या केली. त्यानंतर रक्ताने माखलेल्या अंगाने बॉयफ्रेंडने गळफास घेत आयुष्य संपवले. या धक्कादायक घटनेने रायगड जिल्हा हादरलाय. शेखर दुधाणे आणि पौर्णिमा अशी मृताची नावे आहेत. सुधारगड तालुक्यातील परळीत ही थरकाप उडवणारी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवलाय. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांनी कोयता आणि इतर साहित्य जप्त केलेय. शेखर याने गर्लफ्रेंडची हत्या का केली? त्याने टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
प्रियकराने प्रेयसीचा कोयत्याने खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याने रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका सुन्न झाला आहे. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस तपास सुरू आहे. प्रियकर शेखर दुधाणे आणि त्याची प्रेयसी पौर्णिमा यांच्यातील नातेसंबंध गावात सर्वश्रुत होते. पौर्णिमा परळी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. मंगळवारी रात्री शेखर नर्सिंग होममध्ये पोहोचला आणि पौर्णिमावर कोयत्याने अनेक वार करून निर्घृण खून केला. यानंतर, त्याने तिथेच गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.या घटनेने सुधागड तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेखरने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, शेखर आणि पौर्णिमा यांच्या नातेसंबंधांचा तपशील तपासला जात आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.