महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला असून, मुलींनी निकालात मुलांना मागे टाकत बाजी मारली आहे. ९४.५८ टक्के बारावीतील मुली अव्वल
गुणांनी उत्तीर्ण झाल्या असून, मुलांचा ८९.५१ टक्के निकाल लागलेला आहे.
राज्यातील यशस्वी मुलांचं कौतुक होत असताना सांगली जिल्ह्यातील एका
विद्यार्थ्याच्या निकालाची विशेष चर्चा होत आहे.
हेमंत किरण सटाले असे विद्यार्थ्याचे
नाव आहे. तो आटापाडी तालुक्यातील कौठुळी गावातील रहिवासी आहे. त्याचा
नुकताच बारावीचा निकाल लागला. हेमंतला बारावीत प्रत्येक विषयात ३५ गुण
मिळाले आहेत. एवढंच
नाही तर, त्याला ३५ टक्केच मिळाले आहेत. हेमंत हा व्यावसायिक
अभ्यासक्रमातील टेक्नोलॉजी विभागातील विद्यार्थी आहे. त्याने बारावीचं
शिक्षण इंद्रभाग्य पद्मिनी कॉलेजमधून पूर्ण केलं आहे.
त्याने घेतलेल्या कोर्समध्ये मराठी, इंग्रजी, इंजिनअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप, सायन्स अँड कॅल्क्युलेशन, ट्रेड थिअरी, एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या विषयांचा समावेश होता. त्याला प्रत्येक विषयात पासिंग ३५ गुण मिळाले असून, ३५ टक्केच मिळाले आहेत. सोशल मीडियावर लोक हेमंतला "पासिंग स्टार" म्हणत शुभेच्छा देत आहेत. सध्या त्याची मार्कशीट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.