उत्तर प्रदेशातील कल्याणपूर येथील केशवपुरम येथे डॉ. अनुष्का तिवारी यांच्या उपचारांमुळे गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यांच्या क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर २ जणांचा मृत्यू झाला होता. अभियंत्याच्या मृत्यूनंतर या
प्रकाराच्या संबंधित डॉ. अनुष्काविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात
आली. या घटनेनंतर डॉ. अनुष्काच्या क्लिनिकमधून उपचार घेतलेल्या इतर
जिल्ह्यांतील अनेक रुग्णांनी पुढे येत त्यांच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या
आहेत.
चेहऱ्याची रचना बिघडली
कन्नौजचे रहिवासी जीत
कुमार कटियार यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी डॉ.
अनुष्काच्या क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केले होते. हेअर
ट्रान्सप्लांट झाल्यानंतर जीत यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला संसर्ग
झाला. डॉक्टरांनी हा प्रकार लवकर बरा होईल असे सांगितले, मात्र संसर्गामुळे
चेहऱ्यावर सुज आली आणि चेहऱ्याचा आकाराच बदलला. सध्या जीत कुमार लखनौ येथे
उपचार घेत आहेत.
१५ दिवसांत रूग्णाची अवस्था गंभीर
राजेंद्र पाठक यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२४ मध्ये ते त्यांच्या मित्र विक्रमसोबत क्लिनिकमध्ये गेले होते. विक्रमने हेअर ट्रान्सप्लांट केले. १५ दिवसांच्या आत त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला संसर्ग झाला, जो चेहऱ्यावर पसरला. विक्रमची प्रकृती खूप बिघडली आहे. बारा येथील कंत्राटदार रामजी सचान यांनी सांगितले की, २५ जुलै २०२१ रोजी त्यांनी डॉक्टर अनुष्काच्या क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करून घेतले. एकूण ५२,००० रुपये फी भरले. मात्र प्रत्यक्षात क्लिनिकमध्ये पोहोचल्यावर अप्रशिक्षित नर्सिंग स्टाफकडून हेअर ट्रान्सप्लांट करण्यात येत होते. जे पाहून त्यांना धक्का बसला. या घटनांनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, डॉ. अनुष्का तिवारी यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.