Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, शिक्षकाचा जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव

धावत्या दुचाकीवर वीज कोसळली,  शिक्षकाचा जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव


नांदेड : राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून वळवाच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यासोबतच, अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, काही ठिकाणी नागरिकांनाही आपला जीव गमावाला लागला आहे. आता, नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या दुचाकीवरच वीज कोसळल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नांदेडमध्ये धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी 3 वाजता वीजांच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस झाला. मात्र, वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटाने परिसरात हादरुन गेला होता. या दरम्यान आपल्या करंजी या गावाकडे शिक्षक संजय पांडे दुचाकीवरुन जात होते. 

दुर्दैवाने त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली, त्यात संजय पांडे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने त्यांच्या अंगावर वीज पडल्याची चर्चा परिसरात होत आहे. मात्र, तसा दावा कुठल्याही संबंधित यंत्रणेने किंवा पोलिसांनी केला नाही. दरम्यान, पावसाळी वातावरणात मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासन करत असतं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही घटना घडल्याची देखील चर्चा गावपरिसरात होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.