Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मोठी बातमी! शिक्षण विभागाने घेतला नवा निर्णय

महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मोठी बातमी! शिक्षण विभागाने घेतला नवा निर्णय
 

मुंबई : पुढील महिन्यात, म्हणजेच जून महिन्यात राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 15 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे.शैक्षणिक वर्ष 2025-26 हे 15 जून 2025 पासून सुरू होईल आणि 16 जूनपासून शाळा प्रत्यक्षात भरू लागतील. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच आणि शाळा सुरू होण्याच्या आधीच राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे.ही बातमी विशेषतः पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. तुमच्या कुटुंबात जर पहिली ते आठवीमध्ये शिकणारी मुले असतील, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. कारण, महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.UPI Lite, वॉलेट पेमेंट... ही नवीन फीचर्स युजर्सच्या पसंतीस का पडत नाहीयेत?मिळालेल्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील एकही विद्यार्थी पुस्तकांविना आणि शिक्षणापासून वंचित राहू नये, हाच या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके!
यावर्षी राज्यातील सर्व शाळा 16 जून 2025 रोजी उघडण्याची माहिती मिळाली आहे. मात्र विदर्भातील शाळा काहीसे उशिरा सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या काही दिवसांत विदर्भातील शाळा केवळ सकाळच्या सत्रातच भरवण्यात येणार आहेत.याचे मुख्य कारण म्हणजे विदर्भामध्ये जून महिन्यात तापमानात प्रचंड वाढ होते, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे, विदर्भ विभाग वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांतील शाळा 16 जूनपासून नियमित सुरू होतील.फक्त 500 रुपयांत वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट - कंपनीची खास ऑफर!दरम्यान, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळावीत, यासाठी ही पुस्तके शाळा सुरू होण्याच्या सात दिवस आधीच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत. म्हणजेच, पुस्तके आधीच शाळांमध्ये पोहोचवली जातील.विभागीय, तालुका आणि केंद्र स्तरांवर पाठ्यपुस्तकांची साठवणूक करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, या पुस्तकांच्या वाहतुकीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई, तसेच जिल्हा व तालुका शिक्षण विभागांकडे सोपवली जाणार आहे.

पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वितरणाचा उद्देश

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर, संबंधित शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवसापासून नवीन अभ्यासक्रमाची तयारी करता येईल. तसेच, विद्यार्थ्यांची उपस्थिती 100 टक्के राहावी आणि शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण (गळती) कमी व्हावे, हाच या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.