महाराज
खरशिंग राममंदिरात श्री महाराजांची गोशाळा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात
केसरी वृत्तसेवा
सांगली: हिंदू धर्मात गाय आणि तुळशी वृंदावन यांना अनन्य साधारण महत्व आहे,खरशिंग च्या राममंदिर परिसरात भव्य गोशाळा होते आहे, ते गोंदवलेकर महाराज यांच्यावरील अपार श्रद्धेमुळेच असे मत विद्यावाचस्पती डॉ. संजय कोटणीस महाराज यांनी व्यक्त केले.
खरशिंग येथील श्री राम मंदिर आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पादुका मंदिराच्या प्रांगणात प्रशस्त 51 गायींचा 'श्री महाराजांची गोशाळा' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पायाभरणी व भूमिपूजन समारंभ विद्यावाचस्पती ह. भ. प. डॉ. संजय कोटणीस , देशिंगचे प. पू. आनंद गिरी महाराज,दीपक केळकर महाराज ,
गोव्याचे अवधूत रायकर ,मंदिराचे ट्रस्टी प्रदिप सव्वाशे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मंदिराच्या ट्रस्टी संगीता सव्वाशे, रामकृष्ण गंगातीर्थकर, बाळासाहेब पाटील,विजयसिंह खानविलकर,उत्तम माने, काकासो पाटील, शंकर खोत, भैरू पवार तसेच भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला वंसतराव कुलकर्णी व वैशाली कुलकर्णी यांच्याहस्ते पूजा करण्यात आली,यानंतर श्रीराम जयराम जय जय राम,महाबली हनुमान की जय जय अशा जयघोषात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी डॉ. संजय कोटणीस महाराज म्हणाले, भगवान श्रीकृष्ण जन्मा नंतर नऊ वर्ष गोकुळात राहिला, गाईची सेवा केली, गाईला वंदन केल्यानंतर पाच प्रदक्षिणा घातल्या तर त्रास कमी होतो असे वेदात सांगितले आहे ,अशा मंदिर परिसरात एवढी मोठी गोशाळा होते ती केवळ महाराजांच्या वरील , आम्ही फक्त पोस्टमनचे काम करतो एक दुवा आहोत, महाराज सर्व करवून घेत असतात, भगवंताची सेवा निष्काम भावनांनी केले तर पुण्य मिळते ,गाय असणे हे एक वैभव असते, गोमूत्रापासून येणारा वास आणि त्यावरून चालणे हे एक प्रकारचे औषध मानले जाते .
दिपकनाना केळकर महाराज म्हणाले,अन्नदान नामस्मरण शुद्ध आचरण गोरक्षण ही गोंदवलेकर महाराजांची चतु:सूत्री आहे त्या पद्धतीने महाराजांची निष्काम सेवा या मंदिर परिसरात सुरू असून याच परिसरात ही भव्य दिव्य गोशाळा होते आहे ही भाग्याची गोष्ट आहे. मंदिराचे ट्रस्टी प्रदीप सव्वाशेर यांनी प्रास्ताविक करताना या परिसरात 27 पाढे तीन खोंड आणि सोळा-सतरा मोठ्या गाई अशा 51 गायींचा ही गोशाळा प्रकल्प येत्या पंधरा दिवसात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे,यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा देण्यात करण्यात येणार आहे.गाईंच्या चाऱ्यासाठी ज्यांना सेवा द्यायची आहे त्यांनी द्यावी असे आवाहनही सव्वाशे यांनी केले.कवठेमंहाकाळ तालुक्यातील दंडोबा डोंगराच्या निसर्गरम्य पायथ्याशी उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिर व ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात च्या स्थापनेला तीन वर्षे होत आले , या मंदिरात दररोज दुपारी बारा वाजता आणि रात्री साडेसात वाजता वाजता आरती ,प्रसाद असतो. राम नामासाठी आलेल्या भक्तांची निवासाची सोयही मोफत करण्यात आलेली आहे. याठिकाणी मंदिर सेवा मंडळ व अन्नछत्र सेवा मंडळाच्या माध्यमातून सेवा सुरू आहे,आज या मंदिर परिसरात रामनामासाठी हजारो भक्त सेवा देण्यासाठी येतात, दर पौर्णिमेला कीर्तन, प्रवचन, काकडा आदि धार्मिक कार्यक्रम नित्य नियमाने होत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.