Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- दागिने चोरणारी महिलांची टोळी जेरबंद

सांगली :- दागिने चोरणारी महिलांची टोळी जेरबंद
 

सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथील पंचकल्याणक महोत्सवादरम्यान महिलेचे दागिने चोरणार्‍या महिलांच्या टोळीला सांगली ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून अडीच तोळे हस्तगत केले. लक्ष्मी बाळू सकट (वय 34, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी, कोल्हापूर), दीपाली किशोर काळे (40,रा. मालू हायस्कूलजवळ संभाजीनगर, जयसिंगपूर), सोनू हरी काळे (35, रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रस्ता सांगली), शारदा बंटीनाथ हातळगे (45, रा. नांदणी रोड, जयसिंगपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पंचकल्याणक महोत्सवामध्ये फिर्यादी शंकुतला शशिकांत पाटील (रा. बोलवाड, ता. मिरज) या पूजेसाठी गेल्या होत्या. यावेळी जेवण करून हात धुण्यासाठी गेल्या असता त्यांचे अडीच तोळे सोन्याचे गंठन चोरट्याने लंपास केले होते. संशयित महिला चोरी केलेल्या सोन्याचा दागिना विक्रीसाठी बुधगाव हायस्कूलजवळ येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.पथकाने संशयित चारही महिलांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.