वकील काळा कोट आणि डॉक्टर पांढऱ्या कलरचा कोटच का घालतात? असा प्रश्न अनेकांना नेहमी पडतो, याबाबत मोठी उत्सुकता असते, तुम्हालाही असा प्रश्न कधी-कधी पडत असेल, आज आण त्याचं उत्तर जाणून घेणार आहोत. काळ्या रंगाला नेहमी गंभीरता, शक्ती आणि आदराचं प्रतिक म्हणून मानलं जातं,
त्यामुळे वकील त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात काळ्या रंगाचा कोट घालतात.
मात्र वकिलांनी काळा कोट घालणं ही परंपरा फार जुनी आहे. इतिहासाचा धांडोळा
घेतला तर याची सुरुवात 17 व्या शतकात झाली, 17 व्या शतकात ब्रिटनचे राजे
चार्स द्वितीय यांच्या निधनानंतर ही परंपरा सुरू झाली असं मानलं जातं,
चार्स यांचं निधन झाल्यानंतर शोक व्यक्त करण्यासाठी वकील आणि न्यायाधिशांनी
काळा कोट घातला होता.तिथून पुढे या परंपरेला सुरुवात झाली. काळा कोट
म्हणजे शक्ती, गंभीरता आणि आदराचं प्रतिक असल्यामुळे वकील कोर्टामध्ये काळा
कोट घालूनच केस लढवतात, तसेच न्यायधीश देखील काळा कोट परिधान करूनच
न्यायादानाचं काम करतात.
आता जाणून घेऊयात डॉक्टर का पाढंरा रंगाचा कोट घालतात, पांढरा रंग हा
स्वच्छता आणि विश्वासाचं प्रतिक मानला जातो. वैद्यकीय क्षेत्रात स्वच्छतेला
खूपच महत्त्व आहे. तसेच डॉक्टरने जर पांढर रंगाचा कोट घातला असेल तर
रुग्णाला देखील विश्वास येतो की, हा व्यक्ती आपला जीव वाचवू शकतो,
आजारापासून आपली सुटका करू शकतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वच्छतेचं
आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये स्वच्छता खूप महत्त्वाची असते, तुम्ही जर
पाढंरा कोट घातला असेल तर त्यावर पडलेले डाग लगेचच दिसतात, त्यामुळे देखील
डॉक्टर पांढऱ्या रंगाचा कोट घालतात, तसेच डॉक्टरांनी पांढऱ्या रंगाचा कोट
घालावा आणि वकिलांनी काळा कोट घालावा हा एक इथिकचा देखील भाग आहे.
त्यामुळे तुम्हाला वकील नेहमी काळ्या कोटमध्ये आणि डॉक्टर पांढऱ्या कोटमध्ये दिसतात. डॉक्टर आणि वकील हे समाजाचे महत्त्वाचे भाग आहेत, डॉक्टरांमुळे व्यक्तीला विविध आजारांमधून मुक्ती मिळते, तर वकील एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळून देण्याचं काम करतात. काळा रंग हा गंभीरता, शक्ती आणि आदराचं प्रतिक म्हणून मानलं जातं, त्यामुळे वकील त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात काळ्या रंगाचा कोट घालतात. तसेच पांढरा कलर हा स्वच्छता आणि विश्वास याचं प्रतिक असंत त्यामुळे डॉक्टर पांढऱ्या रंगाचा कोट घालतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.