कुडाळ : राजशिष्टाचार डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत करणार्या ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंटाळे आणि मंडळ अधिकारी संदीप हांगे यांच्यावर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या कर्मचार्यांना मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे आदेश कोणी दिले? असा
प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 11
मे रोजी सिंधुदुर्ग दौर्यावर आले होते. तेव्हा त्यांचे स्वागत जिल्ह्याचे
प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी, पालकमंत्री किंवा स्थानिक आमदार यांनी
करणे गरजेचे असताना वरील तलाठी आणि मंडळ अधिकारी या दोघांनी त्यांचे स्वागत
केले.
त्यांचा हा स्वागत करतानाचा फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध होताच शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या कर्मचार्यांचा आका कोण? असा सवाल केला होता. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी याची गंभीर दखल घेत, ग्राम महसुल अधिकारी कंटाळे व मंडळ अधिकारी हांगे यांना निलंबित केले आहे. निलंबनानंतर या दोघांनाही दोडामार्ग
हेडक्वॉटर दिले असल्याचे समजते. याबाबत कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश
काटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, याचे आदेश जिल्हास्तरावरून
दिले आहेत. दोघांनाही दोडामार्ग हेडक्वार्टर दिले असल्याचे त्यांनी
सांगितले.
... त्यांना आदेश कुणी दिले ?
भारत-पाक सीमेवर युद्ध सुरू असताना सर्व राज्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर होती. खास करून पोलीस नियंत्रण तर चोवीस तास डोळ्यात तेल घालून जबाबदारी पार पाडत होते. आता युद्धविराम झाला तरीही पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले, त्यावेळी हे दोन कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गेले. ते मुख्यमंत्र्यांपर्यंत कसे पोहोचले ? त्यांना कुणाचा आशीर्वाद होता? त्यांना आदेश कुणी दिले ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.