घरमालकांनो सावधान! 'ही' चूक टाळा अन्यथा.., भाडेकरू बनू शकतो घराचा मालक
भारतातील अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये लोक त्यांची मालमत्ता भाड्याने देऊन चांगले पैसे कमवतात. सामान्य लोकच नाही तर मोठे सेलिब्रिटी देखील त्यांच्या मालमत्ता भाड्याने देऊन प्रचंड पैसे कमवत आहेत. एवढेच नाही तर देशातील अनेक लोक फक्त मालमत्ता भाड्याने देण्याचा व्यवसाय करत आहेत. परंतु घरमालकांना त्यांची मालमत्ता भाड्याने देण्यापूर्वी काही अत्यंत महत्त्वाच्या कायद्यांबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे. आज येथे आपण 1963 च्या कायद्याबद्दल जाणून घेऊ, ज्या अंतर्गत भाडेकरू घरमालकाच्या मालमत्तेचा ताबा घेऊ शकतो.
भाडेकरु घेऊ शकतो मालमत्तेचा ताबा
1963 च्या मर्यादा कायदाच्या अंतर्गत जर एखाद्या मालमत्तेचा मालक 12 वर्षांपर्यंत मालकी हक्क सांगू शकला नाही आणि जर भाडेकरू त्या 12 वर्षांपर्यंत मालमत्तेचा ताबा घेत राहिला, तर भाडेकरू त्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकतो. याला मालमत्तेचा प्रतिकूल ताबा म्हणतात. भाडेकरू जेव्हा भाडेपट्टा संपतो किंवा घरमालक भाडे देण्याबाबतच्या भाडे करारातील तरतुदींचे उल्लंघन करतो तेव्हा भाडेकरूंकडून प्रतिकूल ताब्याद्वारे मालकीचा दावा केला जाऊ शकतो.
भारतात प्रतिकूल ताबा कायदा काय आहे?
एखाद्या मालमत्ता मालकाने 12 वर्षांच्या कालावधीत भाडेकरूला घराबाहेर काढण्यासाठी कारवाई केली नाही, तर त्यांना त्यांचे मालकी हक्क गमावण्याचा धोका असतो. त्यामुळे 12 वर्षांच्या आता मालमत्तेवर मालकीचा ताबा सांगणे आवश्यक आहे. अन्यथा भाडेकडू तुमच्या मालमत्तेवर दावा ठोकू शकतो आणि ती संपत्ती बळकावू शकतो. त्यामुळे वेळोवेळी संपत्तीवर ताबा सांगणे गरजेचे आहे.
सरकारी मालमत्तेवरही दावा करता येतो
भारतात भाडेकरू 12 वर्षे सतत राहिल्यानंतर मालमत्तेची मालकी मिळवू शकतो. 1963 च्या मर्यादा कायद्यानुसार, खाजगी मालमत्तेची मालकी हक्क सांगण्याची मुदत 12 वर्षे आहे, तर सार्वजनिक किंवा सरकारी मालमत्तेवर दावा करण्यासाठी मुदत 30 वर्षांपर्यंत आहे. त्यामुळे जर एखादा व्यक्ती सरकारी जागेत 30 वर्षांपासून राहत असेल तर तो त्या मालमत्तेवर दावा करु शकतो आणि ती मालमत्ता मिळवू शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.