Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुण्यातही सापडला रुग्ण; सरकार घेणार मोठा निर्णय?

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुण्यातही सापडला रुग्ण; सरकार घेणार मोठा निर्णय?
 

कोरोनाचे मुंबईत 56 रुग्ण सक्रिय आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई महापालिकेच्या हद्दीतील आहेत, तर राज्यातील इतर जिल्ह्यांपैकी केवळ पुण्यात नव्याने रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील 87 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 87 वर्षीय पुरुषाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आलं आहे. यंदाच्या वर्षातील पुण्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

मे महिन्यात रुग्णसंख्येत किंचित वाढ

या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत कोरोनाचे 87 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 31 बरे झाल्याने सध्या 56 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, महाराष्ट्रात सध्या 57 रुग्ण सक्रिय असून, यापैकी केवळ एक रुग्ण पुण्यात असून उर्वरित सर्व रुग्ण राजधानी मुंबईत आहेत. त्यामध्ये मे महिन्यात किंचित वाढ झाली असली, तरी ती संख्या एखाद्या ठिकाणावरून नसून, विखुरलेल्या स्वरूपातील आहे, असेही आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.

घाबरून जाण्याचे कारण नाही
कोरोना विषाणू सध्याचा सौम्य स्वरूपाचा उपप्रकार असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याआधी जानेवारीत दोन, फेब्रुवारीमध्ये एक आणि एप्रिलमध्ये चार रुग्णांचे निदान झाले होते. मार्चमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता.
या वर्षी कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

आरोग्य विभागाने सोमवारी 46 चाचण्या केल्या. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या 15 होती, तर रॅपिड चाचण्यांची संख्या 31 होती. दरम्यान, 2024 मध्ये चार लाख 84 हजार 352 कोरोना तपासण्या केल्या होत्या. त्यापैकी पाच हजार 528 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यापैकी 35 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. मात्र, या वर्षी कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता
राज्यमंत्रिमंडळाची सकाळी 11.30 वाजता मंत्रालय येथे बैठक होणार आहे. पुण्यात करोनाचा रुग्ण आढळल्याने मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात अवकाळी पावसाने शेतीमालाचे नुकसान झाले आहे. यावरही शेतक-यांना मदत करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू आणि केरळमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.