भारताला मिळाले कॅन्सरला हरवणारे नवे शस्त्र, देशातील पहिले 'एमआर लिनॅक' तंत्रज्ञान नेमके आहे तरी काय?
गाझियाबादच्या यशोदा मेडिसिटी रुग्णालयात भारतातील अत्याधुनिक आणि पहिलीच Elekta Unity MR Linac प्रणाली बसवली जात आहे. ही प्रणाली कॅन्सरवर उपचार करताना थेट MRI स्कॅनिंग आणि अचूक किरणोत्सर्ग एकत्रितपणे वापरणारी भारतातील पहिली यंत्रणा ठरली आहे.
या यंत्रामुळे कॅन्सरवरील उपचार अधिक अचूक, सुरक्षित आणि जलद होतील, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
या नव्या प्रणालीची खासियत म्हणजे
- म्हणजेच रुग्णाच्या शरीरातील अतिशय सूक्ष्म हालचाली देखील उपचारादरम्यान लक्षात घेऊन किरणोत्सर्गाची दिशा आणि प्रमाण त्वरित बदलण्याची क्षमता. यामुळे जर रुग्ण श्वास घेत असताना किंवा हलताना शरीराची स्थिती थोडीशीही बदलली तरी ही प्रणाली अचूक भागावर उपचार करणे सुनिश्चित करते.
यंत्रणा 1.5 टेस्ला क्षमतेच्या हाय क्वालिटीच्या MRI स्कॅनर चा वापर करून कॅन्सर पेशी आणि आजुबाजूच्या अवयवांची प्रत्यक्ष थेट प्रतिमा दाखवते. यामुळे डॉक्टर दररोजच्या स्कॅननुसार रुग्णाच्या शरीरात झालेल्या बदलांवर उपचार पद्धती बदलू शकतात. परिणामी आरोग्यदायी पेशींना कमी नुकसान पोहोचते आणि कॅन्सर पेशींवर थेट वार करता येतो.
ही प्रणाली विशेषतः लहान ट्युमर, लिम्फ नोड्स आणि पुन्हा-पुन्हा किरणोपचाराची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये हायपो-फ्रॅक्शनटेड उपचार शक्य आहेत म्हणजेच कमी वेळात अधिक डोस देणे शक्य होऊन रुग्णाचा वेळ आणि त्रास दोन्ही कमी होतो.
यशोदा मेडिसिटीच्या डॉ. उपासना अरोरा यांनी सांगितले, "हे तंत्रज्ञान म्हणजे कॅन्सर उपचार क्षेत्रात एक क्रांती आहे. यामुळे आपण दर उपचार सत्रात रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिक उपचार करू शकतो, जे अधिक प्रभावी आणि कमी साइड इफेक्ट्स असलेले असतात."
यंत्रणा दूरस्थ उपचार नियोजन (remote treatment planning) सुद्धा शक्य करते. डॉक्टर कोणत्याही ठिकाणाहून रुग्णाचे उपचार नियोजन पाहू शकतात आणि मंजूर करू शकतात, ज्यामुळे वेळ आणि सुविधा दोन्ही वाचतात.
या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील Biology-Guided Radiotherapy (BgRT) सारख्या जैविक सिग्नल्सवर आधारित वैयक्तिक उपचार पद्धतींचा मार्ग मोकळा होईल.
यशोदा मेडिसिटीचे radiation & oncology विभागप्रमुख डॉ. गगन सैनी म्हणाले, "भारतात दरवर्षी १४ लाखांहून अधिक नवीन कॅन्सर रुग्णांची नोंद होते. अशा वेळी हे तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक ठरतं. MR Linac प्रणालीमुळे उपचार अधिक जलद, अचूक आणि सुरक्षित होतील, विशेषतः पुनःपुन्हा किरणोपचार करणाऱ्या रुग्णांसाठी."
ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर, भारतातील कॅन्सर उपचारांसाठी एक नवीन आणि बेंचमार्क तयार होणार आहे याबाबत तज्ज्ञांना ठाम विश्वास आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.