सांगली : चोरट्यांकडून बँक एटीएम लक्ष केले जात असून रात्रीच्या सुमारास एटीएम मधील रक्कम लांबविली जात आहे. अशाच प्रकारे सांगलीच्या बुधगाव येथे बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात चोरट्यांनी तब्बल १५ ते १६ लाख
रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत
आहे. बँक एटीएम असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसते.
याचा फायदा चोरटे घेत असून रात्रीच्या अंधारात एटीएम मशीन मशीन फोडून
त्यातील रक्कम लांबविली जाते. बऱ्याचदा तर थेट एटीएम मशीनच उचलून नेले जात
असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार सांगली जिल्ह्यातील
बुधगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून थेट एटीएम मशीनमधील रक्कम
लांबविली आहे.
दोन दिवसांपूर्वीच एटीएम मशीनमध्ये भरणा
मध्यरात्रीच्या
सुमारास बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएमवर हा दरोडा टाकण्यात आला असून गॅस
कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्यात आले. त्यानंतर मशीनमध्ये असणारी
रोकड लंपास करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी एटीएम मशीनमध्ये बँक ऑफ
इंडिया बँकेकडून वीस लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. त्यामुळे त्यात
सुमारे १५ ते १६ लाखांची रोकड एटीएममध्ये असण्याची शक्यता पोलिसांच्याकडून
व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
दरम्यान हा प्रकार आज सकाळी गावातील नागरिकांच्या लक्षात आला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.