इंडिगोकडून २४ जून ते २९ जून दरम्यान केलेल्या बुकिंगसाठी ही ऑफर देण्यात आली आहे. त्या अंतर्गत १ जुलै ते २१ सप्टेंबर दरम्यान प्रवास करता येईल, असे इंडिगोने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या ऑफरचा फायदा उचलत तुम्हाला विमान प्रवास करता येणार आहे. इंडिगोने २४ जून रोजी 'मान्सून सेल'ची
घोषणा केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना मर्यादित कालावधीसाठी देशांतर्गत आणि
आंतरराष्ट्रीय दरांवर सूट मिळेल. या सूटीचा फायदा उचलत तुम्हाला विमान
प्रवास करता येणार आहे. २४
जून ते २९ जून या कालावधीत केलेल्या बुकिंगसाठी ही ऑफर उपलब्ध आहे. १ जुलै
ते २१ सप्टेंबर या कालावधीत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला
बुकींग करताना तुमचे नियोजन त्याला अनुसरून करावे लागणार आहे.
या सेलमध्ये, ग्राहकांना १,४९९ रुपयांपासून देशांतर्गत आणि ४,३९९ रुपयांपासून आंतरराष्ट्रीय तिकिटे मिळतील. त्यामुळे विदेशवारी करण्यासाठी उत्सूक असलेल्या नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तसेच आतापर्यंत विमानात न बसलेल्या लोकांसाठीही ही एक मोठी संधी आहे. या सूटचे दर प्रत्येक विमानाच्या
तिकिटाच्या किमती आणि जागेची उपलब्धता त्यानुसार बदलू शकतात. याची माहिती
तिकीट बुक करताना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तिकीट बुक करण्यापूर्वी नियम
आणि अटी नीट वाचून घ्याव्यात. इंडिगोने आपल्या अतिरिक्त सेवांवर अनेक
सवलती जाहीर केल्या आहेत. देशांतर्गत विमानांसाठी प्री-पेड अतिरिक्त सामान
वजनावर कंपनी ५०% सूट देत आहे. त्यामुळे विमान प्रवास करताना जास्त सामान
नेणे शक्य होणार आहे. किंवा त्यावर पैसे द्यावे लागणार नाही.
'फास्ट फॉरवर्ड' सेवेवर ५०% सूट मिळेल, ज्यामुळे प्रवाशांना विमानतळ सुरक्षा तपासणीतून जलद गतीने जाण्यास मदत होईल. या सेवेमुळे ग्राहकांचा वेळ वाचेल. हा वेळ दुसऱ्या कामात वापरता येईल. निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर मानक सीट निवडी ९९ रुपयांपासून सुरू होतात. त्यामुळे सीट निवडीवर पैसा खर्च करण्याची गरज भासणार नाही. यातही तुमचे पैसे वाचतील.इंडिगोचे ग्राहक २९९ रुपयांमध्ये शून्य रद्दीकरण योजनेसह त्यांचे बुकिंग सुरक्षित करू शकतात. म्हणजेच कमी पैशांमध्येही बुकिंग करता येणार आहे. आधीच तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही. विमान बुक केल्याच्या तारखेपासून प्रवासाची तारीख ७ दिवसांपेक्षा जास्त असल्यास ऑफर लागू होतील. अशा अनेक नियम आणि अटी यात आहेत. त्यामुळे बुकिंग करताना नियम आणि अटी नीट वाचून घ्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.