मुंबई :- एक दोन नाही, 16 जिवंत साप प्रवाशाचे बॅगेत सापडले आणि मुंबई विमानतळावरच्या आख्ख्या यंत्रणा हादरल्या
मुंबई : मुंबईतील छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री एकच खळबळ उडाली. एका प्रवाशाच्या सामानात 16 जिवंत साप आढळले तेव्हा ही घटना घडली. शुक्रवारी रात्री थायलंडची राजधानी बैंकॉकहून आलेल्या या प्रवाशाच्या सामानात कॉटनच्या पिशवीत लपवलेले साप आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला
असून, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. ही माहिती एका
पोलीस अधिकाऱ्यानं शनिवारी एका वृत्तसंस्थेला दिली.
सामान तपासणीत सापांचा सुळसुळाट
सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री या प्रवाशाला ताब्यात घेतलं. त्याच्या सामानाची तपासणी केली असताना, कॉटनने भरलेल्या पिशवीत 16 जिवंत साप आढळले. यामध्ये दोन केन्याई सँड बोआ, तीन अॅल्बिनो साप, दोन होंडुरन मिल्क स्नेक, एक कॅलिफोर्निया किंगस्नेक, दोन गार्टर स्नेक आणि एक अॅल्बिनो रॅट स्नेक यांचा आणि इतर पाच सापांचा समावेश आहे. या सापांच्या प्रजाती परदेशी असून, त्यांची तस्करी हा गंभीर गुन्हा मानला जातो.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई
पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो आणि सीमा शुल्क विभाग यांच्यासह वन्यजीव संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार या सापांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात रॉ (रेस्क्विंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर) या संस्थेच्या तज्ज्ञांनी सापांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे हाताळण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत घेण्यात आली आहे.
तपासाला गती, कायदेशीर कारवाई सुरू
सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, प्रवाशाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रवाशाने सापांची तस्करी का आणि कशासाठी केली, याचा तपास पोलिस आणि सीमा शुल्क विभाग करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.