कॅन्सरची लागण होण्याच्या 3 वर्षे आधीच कॅन्सरचं निदान झालं तर.... तुम्हाला हे अशक्य वाटतंय ना... मात्र हे खरंय... त्याविषयी संशोधनातून माहिती समोर आली आहे. जर तुम्हाला तीन वर्षे आधीच समजलं की तुम्हाला कॅन्सर होणार आहे तर तुम्ही तो वेळेत थांबवू शकता येणार आहे.
नेमकं हे संशोधन काय आहे हे पाहूयात.
कॅन्सर नाव काढलं तरी अनेकांना धडकी भरते. मात्र कॅन्सरची लक्षणं दिसण्याच्या 3 वर्षे आधीच तुम्हाला कॅन्सरची माहिती मिळाली तर... होय हे शक्य होणार आहे. कारण शास्त्रज्ञांनी मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शनचा शोध लावला आहे. मात्र ही चाचणी काय आहे? ते पाहूयात.
अमेरिकेतील जॉन्स हॉफकिन्स विद्यापीठाचं संशोधन
कॅन्सरचं 36 महिने आधीच निदान होण्याचा दावा
कॅन्सर डिस्कव्हरी या प्रतिष्ठित जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध
मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शन ही प्रायोगिक टेस्ट
डीएन, आरएनए आणि प्रोटीनच्या टेस्टमधून कॅन्सर होण्याचा अंदाज येणार
36 महिने आधीच जनेटिक म्युटेशनमुळे कॅन्सरचं निदान होणार
कॅन्सर होण्यापुर्वीच निदान झाल्यास धोका टळण्याची शक्यता दरवर्षी भारतात 14 लाख लोकांना कॅन्सरची लागण होते. मात्र यंदा त्यात मोठी वाढ झालीय. त्यामुळे हे संशोधन यशस्वी झाल्यास ही वैद्यकीय क्षेत्रातील मोठी क्रांती असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.