Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाशिक :- धक्कादायक ! पोटच्या 6 वर्षाच्या मुलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

नाशिक :- धक्कादायक ! पोटच्या 6 वर्षाच्या मुलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन
 

नाशिक : आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:ही गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. जीवनयात्रा संपवल्याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी, काही दिवसांपूर्वीच या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता.
 
उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार स्वप्निल दीपक गायकवाड (३४, रा. जेलरोड) या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्या सहा वर्षाची मुलगी भैरवीला गळफास देत तिचा खून केला. तसेच स्वत:ही गळफास घेत जीवन संपविले. मंगळवारी (दि. २४) सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना योगमहाल अपार्टमेंट, नाशिकरोड या भागात उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व इतर अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच स्वप्निल गायकवाड यांचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. पत्नीसोबत वारंवार वाद होत असल्याने, त्यांनी घटस्फोट घेतला हाेता. तर मुलीचा त्यांच्याकडे ताबा होता. याच नैराश्यातून त्यांनी जीवन संपविले असावे, असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदींनी भेट देऊन माहिती घेतली. 
 
जीवनयात्रा संपवल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. भावानेही पाच वर्षांपूर्वीच जीवनयात्रा संपवली पोलिस अंमलदार स्वप्निल गायकवाड यांच्या एका भावाचा काही वर्षांपूर्वी गंभीर आजाराने मृत्यू झाला, तर दुसऱ्या भावाने पाच वर्षांपूर्वी रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपवली होती. आता पोलिस कर्मचारी असलेले स्वप्निल यांनी जीवनयात्रा संपवल्याने कुटुंबात केवळ त्यांचे वृद्ध आई-वडील उरले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.