Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking :- अमरावती हादरली! वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या, दुचाकीने जाताना ६ जणांनी रस्त्यात गाठलं अन्...

Big Breaking :- अमरावती हादरली! वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या, दुचाकीने जाताना ६ जणांनी रस्त्यात गाठलं अन्...
 

अमरावती जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. अमरावतीत एका एएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमधील एएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला एका चार चाकीने दुचाकीस्वार पोलीस अधिकाऱ्याला उडवलं. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. पोलीस अधिकाऱ्याला कारने उडवल्यानंतर त्यांच्या पोटावर, छतीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. वार करून पाच ते सहा हल्लेखोर झाले प्रसार झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

एएसआय कलाम हे अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलीस स्टेशनला कार्यरत होते. हल्ल्यानंतर एएसआय कलीम यांना नजीकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळावर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया दाखल झाले आहेत. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहेत. पोलिसांवरील हल्ल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसाच्या हत्येमुळे नागरिकांमध्येही दहशत पसरली आहे. पोलिसाच्या हत्या केल्याने पोलीस वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
 
पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी स्थानिकांनीही मोठी गर्दी केली होती. पोलीस अधिकारी रस्त्याच्या एका बाजूला पडलेले दिसले. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.