Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब; फडणवीसांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ

जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब; फडणवीसांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ
 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी काँग्रेसमधून निलंबनानंतर भाजपमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी याबाबत घोषणा केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आणि काँग्रेसमधून निलंबित केलेल्या नेत्या जयश्री पाटील यांनी अखेर आज भाजपमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब केलंय.

याबाबतची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित करण्यात आली. जयश्री पाटील यांच्या विजय निवासस्थानी आज भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देत त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला. दोन दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश होणार आहे. सकाळी अकरा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे नेते समित कदम, भाजपचे शेखर इनामदार, सी.बी. पाटील आदींनी जयश्रीताई पाटील यांची निवासस्थानी भेट दिली. यावेळी पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी चर्चा केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.