Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रेमसंबंध बिघडताच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला, २४ वर्षीय महिलेला न्यायालयाने सुनावली शिक्षा

प्रेमसंबंध बिघडताच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला, २४ वर्षीय महिलेला न्यायालयाने सुनावली शिक्षा
 

प्रियकरासोबतचं नातं बिघडल्यानंतर त्याच्यासह त्याच्या मित्रावर बलात्काराचा आणि अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला न्यायालयाने शिक्षा सुनावलीय. लखनऊच्या विशेष न्यायालयानं हा ऐतिहासिक निकाल दिला. २४ वर्षीय महिलेनं सामूहिक बलात्काराची तक्रार आणि अट्रॉसिटी अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने महिलेला साडे सात वर्षांची शिक्षा आणि २.१ लाखांचा दंड केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रेखा देवी आणि राजेश यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांचं नातं काही कारणांनी बिनसलं. यानंतर रेखा देवी हिनं राजेश आणि त्याचा मित्र भूपेंद्र कुमार यांच्यावर बलात्काराचा आऱोप केला. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. राजेश आणि भूपेंद्र सिंह यांच्यावर महिलेनं गंभीर असे आरोप केले होते. दोघांना अटक केल्यानंतर तीन महिने तुरुंगात रहावं लागलं. पण पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा हे आरोप खोटे असल्याचं समोर आलं. याबाबत पोलिसांनी न्यायालयात महिलेची तक्रार खोटी असल्याचा अहवाल सादर केला. पोलिसांच्या अहवालानंतर महिलेनं याविरोधात याचिका दाखल केली.

रेखाने पोलिसांच्या अहवालाला विरोध करत याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने या प्रकरणी खटल्याच्या सुनावणीवेळी राजेश व भूपेंद्र यांची निर्दोष मुक्तता केली. तसंच खोटी तक्रार देणाऱ्या रेखाला खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी दोषी ठरवलं. लखनऊच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शरण त्रिपाठी यांनी या खटल्याचा निकाल दिला. न्यायालयाने रेखाला साडे सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसंच २.१ लाखांचा दंडही केला. रेखाने एससी, एसटी कायद्यांतर्गत जो निधी मिळवला तो तिच्याकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने या प्रकरणी सुनावणीवेळी म्हटलं की, एससी, एसटी कायदा, पॉक्सो आणि इतर संवेदनशील कायद्यांचा गैरवापर झाला तर जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होईल. श्रीरामचरितमानसच्या लंका कांडातील एका दोह्याचा उल्लेख न्यायालयाने सुनावणीवेळी दिला. मानहानी झाली की माणूस जिवंत असूनही मृत समजला जातो. एखादा वाईट माणूस चालेल पण अपकिर्ती नको, मानहानी एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते असं म्हणत न्यायालयाने महिलेला शिक्षा सुनावली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.