वाल्मिक कराडने युक्तिवाद करत असतांना आपला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात आपला हात नसल्याचे सांगत, या प्रकरणी मकाको लागत नाही. असं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचा या युक्तिवादाला आम्ही जोरदार विरोध केला. सोबतच न्यायालयाला हे स्पष्ट करून सांगितलं की, आरोपी विरोधात काय काय पुरावे आहे. त्या संपूर्ण पुराव्यांची जंत्री आम्ही न्यायालयासमोर सादर केली. त्याच प्रमाणे कटाचा मुख्य सूत्रधार कायम पडद्यामागे असतो आणि आपल्या कटपूतल्यांचे आधारे तो वाईट कृत्य करत असतो. मात्र या प्रयत्न आपण हाणून पाडला आहे. अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज (24 जून) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या सुनावणीवर भाष्य करत प्रतिक्रिया दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलैला
मा. न्यायालयासमोर आम्ही प्रतिपादन केलं असून येत्या 7 जुलैपर्यंत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. असेही सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार असून आज कोर्टाचे कामकाज तीन तास चालले. यावेळी आरोपी वाल्मीक कराडच्या वकिलांकडून दोन तास युक्तिवाद करण्यात आला. तर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी एक तास युक्तीवाद केला. दरम्यान यावेळी केवळ दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला, अशी माहितीही आता समोर आली आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज (24 जून) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मागील सुनावणी दरम्यान न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची देखील उपस्थिती होती.
वाल्मिक कराडचे वकील मोहन यादवांकडून 1 तास युक्तिवाद, नेमकं काय म्हणाले?
- या प्रकरणातील तीनही गुन्हे वेगवेगळे आहेत. प्रत्येक एफआयआरची वेगवेगळी चारशीट झाली पाहिजे.- वाल्मीक कराडचा मकोकाशी काहीही संबंध नाही. त्यांचा गुन्हा आणि एफआयआर वेगळा आहे.- सहा डिसेंबर रोजी वॉचमन सोनवणे याला मारहाण झाली.. यात खंडणीचा कुठलाही संबंध नाही.- शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे. त्याच्या जबाबात कराड यांचे नाव नाही- 15/1/2025 रोजी कराड याला हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आले- अण्णा म्हणजे वाल्मीक नव्हे संतोष देशमुख यांना देखील अण्णा बोलावले जात होते- केवळ अण्णा नावाने वाल्मीक कराडला आरोपी बनवण्यात आले- कराडच्या वकिलाने मुख्य घेण्यात आलेले जबाब न्यायालयासमोर मांडले.- सीआयडीने मांडलेले हे त्यांचे मत आहे. यात पोलिसांचा तपास गरजेचा होता..
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचा 50 मिनिटे युक्तिवाद
- संपूर्ण केसचा हेलिकॉप व्ह्यू घ्यावा.. आवादाला दोन कोटी मागितले.. वाल्मीक कराड हा दिग्दर्शक जो पडद्या मागे आहे..- संतोष देशमुख यांनी निकटवर्ती यांना सांगितले होते.. यातील डिजिटल पुरावे पुरेसे आहेत..- या घटनेनंतर कराड, चाटे अस्वस्थ झाले. त्यांनी नुसती मारामारी काय करता असा अप्रत्यक्षपणे संदेश दिला..- सुदर्शन घुले हा गॅंग लीडर आहे.. मात्र पडद्यामागे त्याचा सूत्रधार कराड आहे..- या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला नाही तर तज्ञ सीआयडी टीमने केला आहे..- याचा कंट्रोल कराड कडे होता..- कोल्हापुरातील बाल हत्याकांडातील संदर्भ दिला गेला
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.