तुमच्या घरावर हल्ला होईल; ज्या गाडीमध्ये असाल त्या गाडीवर...; मनसे कार्यकर्त्याची गुणरत्न सदावर्तेंना धमकी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधातील तक्रारीनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून गुणरत्न सदावर्तेंना धमकी देण्यात आलीय. तुम्ही ज्या गाडीत असाल ती गाडी फोडू, अशी धमकी मनसे सदावर्ते यांना देण्यात आलीय. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर मनसे कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आलीय. धमकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय.
काय आहे क्लिपमध्ये
व्हायरल झालेल्या धमकीच्या क्लिपमध्ये एक व्यक्ती गुणरत्न सदावर्ते यांना त्यांची गाडी फोडण्याची धमकी देताना ऐकू येतंय. धमकी देणारा व्यक्ती मनसे कार्यकर्ता असल्याचं सांगतोय. मनसे कार्यकर्त्यानं गुणरत्न सदावर्ते यांना फोन केला. गुणरत्न सदावर्ते यांनी विचारलं कोण बोलतंय? सदावर्ते यांच्या या प्रश्नावर मी राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र सैनिक बोलतोय, असं तो व्यक्ती म्हणाला. त्यानंतर तुम्ही राज साहेबांबद्दल चुकीचं स्टेटमेंट कशाला देता? असा सवाल त्याने केला. या प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी सांगितलं की, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. तीन भाषा शिकवण्याचा अधिकार आहे. मला सांगा जर तीन भाष शिकण्याचा अधिकार असल्यानंतर आपण लोकांच्या पोरांना खिशातल्या पैशांनी शिकवतो का? सदावर्ते यांचा प्रश्न ऐकताच त्या व्यक्तीने त्यांना धमकी दिली.तुमच्या घरावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल. उद्या जर तुम्ही गाडीमध्ये असाल तर गाडीची काच फोडली जाईल हे लक्षात ठेवा, अशी धमकी मनसे कार्यकर्त्यानं दिलीय. मनसे कार्यकर्त्याची धमकी ऐकल्यानंतर सदावर्तेही आक्रमक झाले होते. मला हल्ल्याची भीती वाटत नाही, तुम्ही अशा धमक्या मला देऊ नका, राज ठाकरे यांना सुधारायला सांगा, असं सदावर्ते म्हणालेत. राज्य सरकारनं आता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसेकडून राज्य सरकारच्या या धोरणारविरोधात आक्रमक भूमिका घेत विरोध करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.