ज्या दिवशी जन्म त्याच दिवशी कर्णबधिर दिव्यांग प्रमाणपत्र, लाच घेतलेल्या क्लासवन अधिकाऱ्याचा नवीन कारनामा समोर
'सांगलीतील महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे याने शासकीय नोकरी मिळवताना कर्णबधिर दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे. दिव्यांग कोट्यातून नोकरीसाठी त्याने सादर केलेल्या या प्रमाणपत्राची चौकशी करावी,' अशी मागणी २ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती इस्लामपूर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी दिली.
मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, ईडी आणि दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांनाही निवेदनाच्या प्रती दिल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकात म्हटले आहे की, आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यानंतर वैभव साबळे याने श्रवण यंत्राचा वापर सुरू केला. त्याआधी या श्रवण यंत्राचा त्याने कधीही वापर केलेला नव्हता. वैभव सावळे याचा जन्म ज्या दिवशी झाला, त्या दिवशी तो कर्णबधिर असल्याचे प्रमाणपत्र आहे. मात्र जन्मजात कर्णबधिरत्वाची चाचणी होत नाही. या चाचणीसाठी दोन-तीन वर्षांचा कमीत कमी कालावधी लागतो. त्यामुळे त्याने मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आहे.
वैभव साबळे सातारा जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांनी सातारा जिल्हा सोडून धुळे येथून कर्णबधिर प्रमाणपत्र घेतले आहे. ते बेकायदेशीर आहे. या प्रमाणपत्रावर त्याच्या कायमच्या पत्त्याचा उल्लेख नाही. तसेच वैद्यकीय तपासणी अहवालात ते अनुपस्थित आहेत. साबळे याचे दिव्यांग प्रमाणपत्र रद्द करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याच्या शासकीय सेवेच्या भरतीची सखोल चौकशी करावी. त्यांची वैद्यकीय फेरतपासणी राज्याबाहेरील संस्थेमार्फत करण्यात यावी. इस्लामपूर नगरपालिकेच्या सेवा काळातील त्याच्या कामकाजाची तसेच गैरकारभाराची सखोल चौकशी करावी.प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २५ ला पडताळणी करण्यात आली. पडताळणीत साबळे याने स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती सात लाखांच्या लाचेची मागणी साबळे याने केल्याने सोमवारी कारवाई केली. साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.दरम्यान, साबळे याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. काल सायंकाळी सांगलीतील घरावर छापे टाकण्यात आले. आज सातारा येथील मूळ गावी छापेमारी करण्यात आली. काही महत्त्वाची कागदपत्रेही तपासण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नूतन उपाधीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वात निरीक्षक विनायक भिलारे, किशोर खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.