वैष्णवी हगवणे प्रकरणा नाव आल्यानंतर रडारवर आलेल्या जालिंदर सुपेकर यांचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहे. सुरूवातीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकरांचे कारनामे समोर आणले.
त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी IPS जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोघांनी मिळून बाराशे रुपयांची काजू कतली दिवाळी फराळच्या नावाखाली कैद्यांना खायला घातली. मात्र, ती काही त्यांनी खाल्लीच नाही. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास 40 ते 60 टक्के तफावत होती, असा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
राजू शेट्टी यांची पोस्ट काय?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिका-यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप केला आहे. दीवाळीचा फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही, असे म्हटले आहे.
फराळाचे दर हल्दीराम अन् चितळेंच्या दराप्रमाणे पण…
कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम ,काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास ४० ते ६० टक्के तफावत होती.
खरेदीसाठी कोणतीही निविदा नाही
गत दिवाळीत राज्यामध्ये जवळपास ५ कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निवीदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल असे म्हणत शेट्टी यांनी कैद्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या दीवाळी फराळाचे दरपत्रक पोस्ट केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.